शाहूवाडी तालुका

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads


शाहूवाडी तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

‘बर्की’धबधबा 
जलद तथ्य शाहूवाडी तालुकाशाहूवाडी तालुका, राज्य ...

‘बर्की’ हे ठिकाण कोल्हापूरपासून ६0 किलोमीटर अंतरावर आहे. कळे-बाजारभोगाव, करंजफेण मार्गे या ठिकाणी जाता येते. तर मलकापूर-येळवणजुगाई मार्गेही जाता येते. गावाच्या सर्व बाजूंनी उंचच्या उंच पर्वतरांगा असून, पावसाळ्यात हिरवाईचा शालू नेसतात. धबधब्याकडे जाण्यासाठी गावापासून तीन किलोमीटर पुढे पायपीट करावी लागते. धबधबक्याकडे जाताना हिरवे डोंगर, जलाशय, खळखळणारे ओढे, डोलणारी झाडे, फुले, पक्षी, डोंगरातून कोसळणारे प्रवाह अशी निसर्गाची उधळण अनुभवायास मिळते. येथील सुंगधी वातावरणाची भूल प्रत्येकाला मोहविते. धबधब्याच्या मार्गावरच आता जलाशय बांधला असून, याठिकाणी बोटिंगची सोय करण्यात आली आहे. २० फूट रुंदीच्या पात्रातून सुमारे ४०० फुटांवरून कोसळतो. मुख्य धबधब्याच्या आजूबाजूला आणखी चार धबधबे आहेत. इथे मुक्कामासाठी सोय नसल्याने एका दिवसाचीच ही सहल करावी. जेवणाची आणि नाष्ट्याची चांगली सोय होते. येथे घरगुती पद्धतीचे चांगले जेवण मिळते. धबधब्याकडे जातानाच एखाद्या घरात जेवणाची आर्डर दिली, तर धबधब्यातून भिजून आल्यावर नाचण्याची भाकरी, झणझणीत भोजनावर ताव मारता येतो.

Remove ads
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads