श्रीरामपूर तालुका
महाराष्ट्रातील तहसील, भारत From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
हा लेख श्रीरामपूर तालुका विषयी आहे. श्रीरामपूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
Remove ads
भौगोलिक स्थान
श्रीरामपूर हा अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील तालुका आहे. श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वेस नेवासा, पश्चिमेस राहता तर दक्षिणेस राहुरी तालुका आहे. उत्तरेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची हद्द आहे.
इतिहास
हरेगाव - हे श्रीरामपूर तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव असून या ठिकाणी ब्रॅन्डी कंपनीने 'बेलापूर शुगर इंडस्ट्रीज अलाइड लिमिटेड' नावाचा साखर कारखाना इ.स. १९१७ साली सुरू केला. हरेगाव येथे मत मौली आहे. कारखाना सुरू करण्यापूर्वी येथे गुळाचे उत्पादन घेतले जात होते असे. त्यानंतर या कंपनीने ब्रिटिश सरकारकडून भाडेपट्ट्यावर हजारो एकर जमीन घेतली व २२ एकर परिसरात हा कारखाना सुरू करण्यात आला. त्यावेळी साखर कारखान्यातील कामगार उसाच्या चिपाडांपासून बनवलेल्या खोपटांत राहत असत. त्या खोपट्यांना मोठी आग लागून सर्व झोपड्या जळून गेल्या. नंतर कारखाना व्यवस्थापन आणि प्रातिनिधिक युनियन यांनी मिळून उत्कृष्ट अशी कामगार वसाहत निर्माण केली. तिच्यात चांगली सांडपाण्याची व्यवस्था होती. कामगारांसाठी एक दवाखाना होता व त्यांच्या मुलांसाठी शाळाही चालवली जात होती. खास बाब म्हणजे आज आपण जे दूध डेरी प्रकल्प, कोंबडी पालन प्रकल्प पाहतो तसले प्रकल्प हरिगाव येथे कारखान्यामार्फत १९४० पासून चालू होते. कामगारांची एक सोसायटी होती आणि जीवनावश्यक वस्तूंचे एक दुकानही होते. मात्र पुढे सहकारी चळवळीमुळे या खाजगी कारखान्याचा अंत झाला. कारखान्याचे पहिले सर व्यवस्थापक लोकमान्य टिळकांचे नातू श्री. के के महाजन होते. आशिया खंडातील पहिला साखर कारखाना हरेगाव येथे स्थापन झाला होता. तसेच हरेगाव साखर कारखान्याव्यतिरिक्त आसपासच्या गावांमध्येसुद्धा अनेक कारखाने होते.
श्रीरामपूर येथील रामनवमीची यात्रा खूप प्रसिद्ध आहे.
श्री क्षेत्र सराला बेट - हे गोदावरीच्या कुशीत वसलेले असे एक नयनरम्य तीर्थक्षेत्र आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेले बेट सराला हे भगवान शिवाचे फार प्राचीन असे तीर्थक्षेत्र आहे. या बेटामध्ये सदगुरू श्री गंगागिरीजी महाराज यांनी वास्तव्य केले व येथे सप्ताहाची परंपरा प्रारंभ केली. ती आजतागायत महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड सुरू आहे.
दायमाबाद - पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ
Remove ads
गावे
अशोकनगर,उक्कलगाव,उंदीरगाव,एकलहरे,ऐनतपूर
कडीत (खुर्द व बुद्रुक),कमालपूर,कान्हेगाव,कारेगाव
कुरणपूर,खानापूर,खिर्डी,खोकर,खंडाळा,गळनिंब
गुजरवाडी,गोंडेगाव,गोवर्धन,घुुुमनदेव,जाफराबाद
टाकळीभान,टिळकनगर,दत्तनगर,दिघी,नरसाळी,नाऊर
नायगाव,निपाणी वडगाव,निमगाव खैरी,पढेेेगाव
फत्याबाद,बेलापूर (खुर्द व बुद्रुक),ब्राम्हणगाव
भामाठाण,भेर्डापूर,भोकर,महांकाळ वडगाव,मातापूर
मातुलठाण,मांडवे,मालुंजा (खुर्द व बुद्रुक),
माळवडगाव,माळेवाडी,मुठेवडगाव,रांजणखोल,रामपूर
लाडगाव,वडाळा महादेव,वळद उंबरगाव,
वांगी (खुर्द व बुद्रुक),शिरसगाव,सराला बेट
हरेगाव
बाह्य दुवे
- "बेलापूर (श्रीरामपूर) तालुक्याचा नकाशा". ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.
श्रीरामपूर जिल्ह्यातील गावे: उक्कलगाव, बेलापुर, हरेगाव, ममदापुर, गळनिंब, फत्याबाद, इ.
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads