सुंदरबन राष्ट्रीय उद्यान

भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान. From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यात असून बांगलादेशाच्या सीमेलगत आहे. जगातील सर्वाधिक वाघांची संख्या या उद्यानात आढळते. अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्गामुळे तसेच मोठ्या प्रमाणावर आढळणारे वन्यप्राणी व पक्षी यांमुळे सुंदरबनची जागतिक वारसा स्थान म्हणून निवड झाली आहे.[]

जलद तथ्य
Remove ads

जंगल प्रकार

Thumb
सुंदरबनचे जंगल

याचे जंगल हे मुख्यत्वे खारफुटीचे जंगल आहे. खारफुटीला इंग्रजीत मॅग्रोव्ह म्हणतात. सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. सुंदरबनमध्ये ६४ प्रकारच्या वनस्पती आढळतात. जगातील खारफुटीच्या ५० टक्यांपेक्षाही अधिक वनस्पतीच्या प्रजाती येथे आहेत. सुंदरी नावाची वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते त्यामुळेच सुंदरबन नाव पडले आहे. इतर वनस्पतीमध्ये गेनवा, धुंदाल, पासुर, गर्जन, गोरान या प्रमुख वनस्पती आहेत[].

Remove ads

भौगोलिक

हे उद्यान मुख्यत्वे गंगेच्या त्रिभुज प्रदेशात आहे. या प्रदेशात ५४ बेटे आहेत. सुंदरबनचा विस्तार कित्येक हजार चौ किमीचा आहे त्यातील खूपच छोटा भाग भारतात येतो बहुतांशी भाग हा बांगलादेशात आहे. जिथे गंगेचे गोडे पाणी समुद्रात मिळते अशा ठिकाणी हे सुंदरबन आहे. त्यामुळे उद्यानात काही जागी गोडे तर काही जागी खारे पाणी आढळते. त्रिभुज प्रदेश हा गंगेने हजारो वर्षात आणलेल्या गाळामुळे तयार झालेला प्रदेश आहे. या प्रदेशात काही ठिकाणी जमीन उंचावली आहे तर काही जागी कायम दलदल असते[]. अशा कारणांमुळे अतिशय वैविध्यपूर्ण असे हे जंगल तयार झाले आहे. पावसाळ्यात प्रचंड पुराने येथील पाण्याची पातळी वाढते.

वातावरण

समुद्राजवळ असल्याने येथे वर्षभर अत्यंत दमट हवा असते. पावसाळ्याच्या महिन्यात म्हणजे जून ते सप्टेंबर मध्ये प्रचंड पाऊस पडतो. सरासरी तापमान ३४ ते २० अंश सेल्शियस असते. हिवाळा नाममात्रच असतो. वादळे व चक्रीवादळे ही येथे नेहमीची आहेत.[]

Remove ads

प्राणी जगत

सुंदरबनचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथील वाघांची संख्या. भारतातील सर्वाधिक वाघ येथे आढळून येतात. जंगल हे खारफुटीचे व दलदलमय असल्याने जंगलात प्रवेश करून वाघ पहाणे येथे अवघड असते. तसेच येथील वाघ माणसांच्या बाबतीत अत्यंत आक्रमक आहेत. वाघांच्या माणसावरील हल्याच्या सर्वाधिक घटना सुंदरबनच्या प्रदेशात होतात. अभ्यासकांच्या मते खाऱ्या पाण्यामुळे येथील वाघ जास्त आक्रमक आहेत व त्यामुळे नरभक्षक बनतात; तरीही कोणीही ठामपणे सांगू नाही शकत की येथीलच वाघ माणसांबाबतीत आक्रमक का आहेत[] . काही भक्ष्य न मिळाल्यास येथील वाघ मासे देखील मारून खातात.

वाघांच्या मुख्य खाद्यामध्ये चितळबाराशिंगा ही हरणे येतात. चितळांची संख्याही बरीच आहे. येथील चितळांचे खूर इतर चितळांपेक्षा थोडीसे वेगळी असून दलदलीमध्ये व पाण्यामध्ये पोहोण्यासाठी अनूकूल बनले आहेत. इतर प्राण्यांमध्ये माकडे, रानडुक्कर, मुंगुस, खोकड, रानमांजर, खवलेमांजर येतात[].

सापांच्या अनेक प्रजाती येथे आढळतात. विविध प्रकारचे पाणसाप, अजगर, नाग, नागराज, फुरसे, घोणस, मण्यार, पट्टेरी मण्यार, समुद्री साप यांसारखे अनेक विषारी साप सुंदरबनात आढळतात. शिवाय, इतर सरपटणाऱ्या प्रजाती उदा: घोरपडी, मगरी, अनेक प्रकारची समुद्री कासवे, तसेच जमिनीवरील काही जातीची कासवेही येथे आढळतात [].

पक्ष्यांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. यात मुख्यत्वे पाणथळी पक्ष्यांचा समावेश होतो. पहा सुंदरबनातील पक्षी Archived 2008-08-03 at the Wayback Machine.

माहिती

  • जवळचे गाव-गोसाबा ५० किमी
  • जवळचे शहर- कोलकाता ११२ किमी
  • जवळचे विमानतळ- कोलकाता डम डम विमानतळ ११२ किमी
  • जवळचे रेल्वेस्थानक- कॅनिंग ४८ किमी वर
  • भेट देण्याचा सर्वोत्तम काळ - नोव्हेंबर ते फेब्रुवारी
  • इतर - उद्यानाला भेट देण्यासाठी खास परवाने मिळवावे लागतात. पश्चिम बंगाल वनखात्याकडून ते मिळतात. उद्यानातील गाभा क्षेत्रात मनुष्य वावरावर पूर्ण बंदी आहे. पर्यटकांनी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करणे अपेक्षित असते.
Remove ads

बाह्य दुवे

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads