१९६२ लोकसभा निवडणुका
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
१९६२ लोकसभा निवडणुका ह्या तिसऱ्या लोकसभेचे सदस्य निवडण्यासाठी भारतात १९ ते २५ फेब्रुवारी १९६२ दरम्यान झाल्या. मागील दोन निवडणुकांच्यापेक्षा वेगळे म्हणजे ह्या वेळी प्रत्येक मतदारसंघाने एकच सदस्य निवडला.[१]
जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या निवडणूक प्रचारात आणखी एक मोठा विजय मिळवला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ४४.७% मते मिळाली आणि ४९४ पैकी ३६१ जागा जिंकल्या. मागील दोन निवडणुकांपेक्षा हे प्रमाण थोडे कमी होते आणि तरीही त्यांनी लोकसभेच्या ७०% पेक्षा जास्त जागा जिंकल्या.
Remove ads
निकाल

चौदा सदस्यांची नामांकनाने नियुक्ती करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरचे प्रतिनिधित्व करणारे सहा, अँग्लो-इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करणारे दोन, लक्षद्वीपचे प्रतिनिधित्व करणारे एक, अंदमान आणि निकोबार बेटांचे प्रतिनिधित्व करणारे एक, दादरा आणि नगर-हवेलीचे प्रतिनिधित्व करणारे एक, गोवा दमण आणि दीवचे प्रतिनिधित्व करणारे एक, नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सीचे प्रतिनिधित्व करणारे एक, आणि तुएनसांग व नागा हिल्सचे प्रतिनिधित्व करणारे एक.
Remove ads
पोटनिवडणूक
१९६२ मधील मध्य प्रदेश राज्यातील बिलासपूर लोकसभा जागेसाठीच्या निवडणूका मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने रद्दबातल घोषित केली. बशीर अहमद कुरेशी या उमेदवाराचा अर्ज "रिटर्निंग ऑफिसरने अयोग्य आणि बेकायदेशीरपणे फेटाळले होते" असा निकाल न्यायालयाने दिला होता.[२]१९६३ मध्ये येथे पोटनिवडणूक झाली. ही निवडणूक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सी. सिंग यांनी ८६,२२९ मतांनी जिंकली, तर जनसंघाचे एम.एल. शुक्ला यांना ५४,१५६ मते मिळाली.[३]
Remove ads
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads