अमर्त्य सेन
From Wikipedia, the free encyclopedia
अमर्त्य सेन (बांग्ला: অমর্ত্য সেন , उच्चार - ओमोर्तो शेन; रोमन लिपी: Amartya Sen) (३ नोव्हेंबर, इ.स. १९३३ - हयात) हे बंगाली-भारतीय अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ आहेत. यांना कल्याणाभिमुख अर्थशास्त्र[श 1] व सामाजिक पर्याय सिद्धान्त[श 2] या विषयांतील कार्यासाठी इ.स. १९९८ सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.[1] गरिबी ,आरोग्य ,शिक्षण , मानवी विकास आणि एकूणच मानवी कल्याण त्यांच्या विचाराचा गाभा आहे . भारतीय केंद्रशासनाने नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी इ.स. २००७ साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे [श 3] हे अध्यक्ष आहेत [2] एकूण ४० वर्षात, ३०हून अधिक भाषांत अमर्त्य सेन यांची पुस्तके प्रकाशित झाली आहे. ते 'ऑक्सब्रिज कॉलेज'चे पहिले आशियाई प्रमुख आहेत.
जलद तथ्य
अमर्त्य सेन | |
जन्म | ३ नोव्हेंबर, १९३३ (1933-11-03) (वय: ९०) शांतिनिकेतन, भारत |
निवासस्थान | न्यू यॉर्क शहर अमेरिका |
नागरिकत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अर्थशास्त्र |
प्रशिक्षण | हार्वर्ड विद्यापीठ (२००४ - ) कैम्ब्रिज विद्यापीठ (१९९८-२००४) हार्वर्ड विद्यापीठ (१९८८-१९९८) ऑक्सफर्ड विद्यापीठ (१९७७-१९८८) लंडन अर्थशास्त्र विद्यालय (१९७१-१९७७) दिल्ली अर्थशास्त्र विद्यालय (१९६३-१९७१) कैम्ब्रिज विद्यापीठ (१९५७-१९६३) जाधवपूर विद्यापीठ (१९५६-१९५८) |
पुरस्कार | अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते |
बंद करा