![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/ce/Map-IranianLanguages.png/640px-Map-IranianLanguages.png&w=640&q=50)
इराणी भाषासमूह
From Wikipedia, the free encyclopedia
इराणी हा इंडो-युरोपीय भाषासमूहामधील इंडो इराणी ह्या गटामधील एक उप-भाषासमूह आहे. ह्या भाषासमूहामध्ये अंदाजे ८७ भाषा असून त्या प्रामुख्याने पश्चिम आशिया प्रदेशामध्ये वापरात आहेत.[1] २००८ च्या अदाजानुसार १५-२० कोटी व्यक्ती या भाषासमूहातील भाषा बोलतात.[2] पैकी अंदाजे ७.५ कोटी व्यक्ती फारसी, ५ कोटी पश्तो ३.२ कोटी कुर्दी तर २.५ कोटी व्यक्ती बलुची भाषा वापरतात.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/ce/Map-IranianLanguages.png/640px-Map-IranianLanguages.png)