![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b6/Istanbul_districts.png/640px-Istanbul_districts.png&w=640&q=50)
इस्तंबूल प्रांत
हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. / From Wikipedia, the free encyclopedia
इस्तंबूल (तुर्की: İstanbul ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताच्या उत्तरेला काळा समुद्र व दक्षिणेकडे मार्माराचा समुद्र आहेत. बोस्फोरस ही सामुद्रधुनी इस्तंबूल प्रांताला युरोप व आशिया गटांमध्ये विभागते. इस्तंबूल हे तुर्कस्तानमधील सर्वात मोठे शहर ह्याच प्रांतात स्थित असून १.३८ कोटी लोकसंख्या असलेला इस्तंबूल प्रांत ह्या बाबतीत तुर्कस्तानमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
जलद तथ्य
इस्तंबूल İstanbul ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
![]() इस्तंबूलचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | ![]() |
राजधानी | इस्तंबूल |
क्षेत्रफळ | ५,३१३ चौ. किमी (२,०५१ चौ. मैल) |
लोकसंख्या | १,३८,५४,७४० |
घनता | २,५५१ /चौ. किमी (६,६१० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-34 |
संकेतस्थळ | www.istanbul.gov.tr |
बंद करा
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b6/Istanbul_districts.png/640px-Istanbul_districts.png)