तुर्की भाषा
From Wikipedia, the free encyclopedia
तुर्की भाषा (उच्चार:ˈt̪yɾktʃe) मध्यपूर्वेतील भाषा आहे. ही ६ कोटी ३० लाख लोकांची मातृभाषा आहे.[1] ही भाषा मुख्यत्वे तुर्कस्तान, सायप्रस तसेच इराक, ग्रीस, बल्गेरिया, मॅसिडोनिया, कोसोव्हो आणि आल्बेनियामध्ये वापरली जाते. या भागांतून परागंदा झालेले लोकही ही भाषा वापरतात.
तुर्की भाषासमूह याच्याशी गल्लत करू नका.
जलद तथ्य तुर्की, स्थानिक वापर ...
तुर्की | |
---|---|
Türkçe | |
स्थानिक वापर | तुर्कस्तान, आल्बेनिया, अझरबैजान, कोसोव्हो, मॅसिडोनिया, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, मोल्दोव्हा व युरोपातील इतर अनेक देश |
प्रदेश | मध्यपूर्व, युरोप |
लोकसंख्या | ८.३ कोटी |
भाषाकुळ |
तुर्की भाषासमूह
|
लिपी | लॅटिन (तुर्की प्रकार) |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर |
तुर्कस्तान उत्तर सायप्रस सायप्रस |
अल्पसंख्य दर्जा | |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | tr |
ISO ६३९-२ | tur |
बंद करा
सुमारे १,२०० वर्षांचा लिखित इतिहास असलेल्या या भाषेचा उगम मध्य आशियात झाला. ऑटोमन साम्राज्याबरोबर ही भाषा युरोपमध्ये पसरली. भारतातही उर्दू भाषेतल्या गझलांमध्ये अनेक तुर्की शब्दांचा वापर असतो. अरबी, फार्सी आणि तुर्की शब्दांचे ज्ञान असेल तर उर्दू शायरी समजणे सोपे जाते.