औसा विधानसभा मतदारसंघ
हा महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. / From Wikipedia, the free encyclopedia
औसा विधानसभा मतदारसंघ - २३९ (Ausa Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, औसा मतदारसंघात लातूर जिल्ह्याच्या १. औसा तालुक्यातील लामजाना, मातोळा, किल्लारी, औसा ही महसूल मंडळे आणि औसा नगरपालिका आणि निलंगा तालुक्यातील मदनसुरी, कासार शिरसी, कासार बाळकुंदा ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. औसा हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो.[1][2]
भारतीय जनता पक्षाचे अभिमन्यु दत्तात्रय पवार हे औसा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[3][4]