तिबेटी भाषा
From Wikipedia, the free encyclopedia
प्रमाण तिबेटी (तिबेटी लिपी: བོད་སྐད ; वायली लिप्यंतर: Bod skad, भो का ; इंग्लिश: Standard Tibetan ;) ही तिबेटाची अधिकृत भाषा आहे[1]. मध्य तिबेटी भाषाकुळातील यू-त्सांग प्रादेशिक शाखेतील ल्हासा येथील बोलीभाषा प्रमाण तिबेटीसाठी आधार मानली जाते. यामुळे प्रमाण तिबेटीला काही वेळा मध्य तिबेटी भाषा (तिबेटी लिपी: དབུས་གཙང་སྐད ; वायली लिप्यंतर: Dbus-gtsang skad / Ü-tsang kä, यू-त्सांग का ;) या नावानेही उल्लेखले जाते. मात्र मध्य तिबेटी भाषा तिबेटी भाषाकुळाच्या अनेक शाखांपैकी एक शाखा असून खाम्स (तिबेटी लिपी: ཁམས་སྐད ; वायली लिप्यंतर; Khams skad / Kham kä, खाम का ;), आम्दो (तिबेटी लिपी: ཨ་མདོ་སྐད་ ; वायली लिप्यंतर; A-mdo skad / Am kä, आम का ;), लदाखी (तिबेटी लिपी: ལ་དྭགས་སྐད་ ; वायली लिप्यंतर; La-dwags skad / Tö kä, तो का ;)