दमयंती जोशी
भारतीय नृत्यांगना / From Wikipedia, the free encyclopedia
दमयंती जोशी (जन्म :५ सप्टेंबर १९२८, - मुंबई, १९ सप्टेंबर २००४) या कथक हे भारतीय शास्त्रीय नृत्य करणाऱ्या नृत्यांगना होत्या. त्यांनी सन १९३० च्या दशकात मॅडम मेनका यांच्या पथकामध्ये नृत्य करायला सुरुवात केली. हे पथक जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये आपली कला सादर करत असे. दमयंती यांनी जयपूर घराण्याचे सिताराम प्रसाद यांच्याकडून कथ्थक नृत्याची तालीम घेतली आणि अतिशय लहान वयात त्या चांगल्या नृत्यांगना बनल्या. नंतर त्यांनी लक्ष्मण महाराज आणि शंभू महाराज या लखनौ घराण्याच्या गुरूंकडून नृत्याची तालीम घेतली. त्यामुळे त्यांच्या नृत्यामध्ये दोन्ही घराण्यांची वैशिष्ट्ये दिसत. सन १९५० पासून स्वतंत्ररीत्या नृत्याचे सादरीकरण करू लागल्या. १९६० च्या दरम्यान त्या मान्यताप्राप्त कलाकार बनल्या. त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये स्वतःचे नृत्य विद्यालय सुरू केले. त्यांना १९६८मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार व १९७०मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य संगीत नृत्य अकादमी पुरस्कारसुद्धा मिळाला. लखनौमधील उत्तर प्रदेश कथक केंद्राच्या त्या संचालिका होत्या.(१९९०-९३)[1]
दमयंती जोशी | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | ५ सप्टेंबर १९२८ |
जन्म स्थान | मुंबई |
संगीत कारकीर्द | |
कार्य | कथक नृत्य |
पेशा | नर्तिका, नृत्य दिग्दर्शक |
गौरव | |
गौरव | पद्मश्री - १९७० |
पुरस्कार | संगीत नाटक अकादमी पुरस्कार – १९६८ |