![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/72/LocationWesternSahara.svg/langmr-640px-LocationWesternSahara.svg.png&w=640&q=50)
पश्चिम सहारा
From Wikipedia, the free encyclopedia
पश्चिम सहारा हा उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को देशाच्या अंमलाखालील एक वादग्रस्त भूभाग आहे. सहारा वाळवंटाने व्यापलेला पश्चिम सहारा हा जगातील सर्वात विरळ लोकवस्ती असलेल्या भागांपैकी एक आहे. सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक हा अंशतः मान्य देश पश्चिम सहारावर आपला अधिकार सांगतो.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/72/LocationWesternSahara.svg/640px-LocationWesternSahara.svg.png)
हा प्रदेश एकोणिसाव्या शतकाअखेरपासून स्पेनने व्यापला होता. इ.स. १९६३मध्ये मोरोक्कोने त्यास विरोध दर्शविल्यावर याला संयुक्त राष्ट्रांच्या पारतंत्र्यात असलेल्या प्रदेशांच्या यादीत घालण्यात आले.[1]