महाराष्ट्र नवनिर्माण सेना
भारतातील एक राजकीय पक्ष / From Wikipedia, the free encyclopedia
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (संक्षिप्त : मनसे) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक/राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी ह्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश, आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे.२०१६ या वर्षापासून मनसेचा दरवर्षी गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मुंबई येथे (शिवतीर्थावर) भरतो लाखो लोकांची या मेळाव्याला उपस्थिती असते
अधिक माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना | |
---|---|
पक्षाध्यक्ष | राज ठाकरे |
स्थापना | ९ मार्च २००६ |
मुख्यालय | दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई[1] |
विधानसभेमधील जागा | १ |
राजकीय तत्त्वे | महाराष्ट्राचा आणि मराठीचा सर्वांगीण विकास, मराठी राष्ट्रवाद[2] |
बंद करा