उत्तर अमेरिकेतील एक नदी From Wikipedia, the free encyclopedia
मिसिसिपी नदी (इंग्लिश: Mississippi River) ही उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठी नदी आहे. मिसिसिपी नदीचा उगम मिनेसोटा राज्यातील इटास्का सरोवरामध्ये होतो. येथून ही नदी दक्षिण दिशेला ३,७३० किमी (२,३२० मैल) वाहते व लुईझियानातील न्यू ऑर्लिन्स शहराच्या १५३ किमी दक्षिणेला मेक्सिकोच्या आखाताला मिळते. ही नदी मिनेसोटा व लुईझियाना ह्या राज्यांमधून वाहते तर विस्कॉन्सिन, इलिनॉय, केंटकी, टेनेसी व मिसिसिपी ह्या राज्यांच्या पश्चिम सीमा व आयोवा, मिसूरी व आर्कान्सा ह्या राज्यांच्या पूर्व सीमा मिसिसिपी नदीने आखल्या गेल्या आहेत.
मिसिसिपी नदी | |
---|---|
मेम्फिसमधील मिसिसिपी नदीवरील एक पूल | |
उगम | इटास्का सरोवर, मिनेसोटा 47°13′05″N 95°12′26″W |
मुख | मेक्सिकोचे आखात 29°9′4″N 89°15′12″W |
पाणलोट क्षेत्रामधील देश |
अमेरिका मिनेसोटा, विस्कॉन्सिन, इलिनॉय, केंटकी, टेनेसी व मिसिसिपी, आयोवा, मिसूरी, आर्कान्सा व लुईझियाना |
लांबी | ३,७३० किमी (२,३२० मैल) |
उगम स्थान उंची | ४५० मी (१,४८० फूट) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | २९,८१,०७६ |
उपनद्या | मिनेसोटा नदी, मिसूरी नदी, ओहायो नदी, आर्कान्सा नदी, इलिनॉय नदी, टेनेसी नदी |
मिसिसिपी ही लांबीने जगातील चौथ्या क्रमांकाची नदी आहे. मिसूरी व ओहायो ह्या दोन मिसिसिपीच्या सर्वात मोठ्या उपनद्या आहेत.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.