विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा
From Wikipedia, the free encyclopedia
मराठी विकिपीडिया केवळ एक विश्वकोश आहे. मराठी विकिपीडियाचा वाचक आणि संपादक वर्ग वैविध्यपूर्ण आहे. त्यांच्या तेवढ्याच विविध अपेक्षा असतात आणि काही जणांना विकिपीडियाची पूर्ण माहिती असते, काहींना काहीच पूर्व कल्पना नसते तर काही वेळा आपण गृहीत धरतो त्यापेक्षा स्वरूप वेगळे असते. त्यामुळे या सहाय्य लेखाच्या माध्यमातून हवे होते, अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा स्पष्ट करण्याचा प्रयत्न आहे. तसेच कोणत्या गोष्टी विकिपीडियात न होता त्याच्या सहप्रकल्पात कुठे होतात याची माहिती देणे आहे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश असल्यामुळे मजकूर विश्वकोशास साजेशा स्वरूपात बसवावा लागतो, म्हणजे काय ते आपण खाली पुढे पाहू.
परंतु, आपल्या लेखनाबद्दल दिलेले कोणतेही संदेश केवळ पुर्नलेखनाची विनंतीच असतात. असे पुर्नलेखन तुम्ही स्वतःच पूर्ण केले पाहिजे असेही नाही, इतर मंडळींकरिता ते तसेच सोडण्यासही तुम्ही मुक्त असता. त्यामुळे आपण आपले इतर लेखन किंवा वाचन चालू ठेऊन खालील सहाय्यपर लेखनसुद्धा आपल्या सवडीने जरूर तेवढेच वाचू शकता.
आपण लेखन केलेल्या लेखानापुढे शीर्षकलेखन संकेत, पुर्नलेखन, विकिकरण, संदर्भ द्या, व्यक्तिगत मते, शुद्धलेखन, पक्षपात, पूर्वग्रह अशा अर्थाचे काही संदेश, लेखन करणार्या संपादकास घाबरवण्याकरिता नव्हे तर आपल्यासारख्या नवागत सदस्यांच्या लेखनाकडे नियमित जाणत्या सदस्यांचे लक्ष जावे आणि विकिपीडियाच्या स्वरूपास अनुकूल विकिकरण (बदल) करण्यास आपल्याला सहाय्य आणि सहयोग उपलब्ध व्हावा, असे असते आणि कालौघात लेखात दर्जात्मक सुधारणा व्हावी असा उद्देश असतो.
त्याशिवाय, असा संदेश कुणी लावला आहे ते लेखाच्या इतिहासात पाहून संबंधित सहसंपादकाच्या चर्चा पानावर लेखाच्या चर्चा पानावर, चावडी, मदत केंद्र इत्यादी ठिकाणी आपण आपले शंका निरसन करून घेऊ शकता. असे संदेश लावण्यात आपल्यालाही पुढाकार घ्यावयाचा असेल तर विकिपीडियाचा दर्जा सांभाळण्याच्या अमूल्य कार्यात विकिपीडिया:पहारा आणि गस्त ,विकिकरण आणि इतर विवीध समन्वय प्रकल्पात आपण स्वतःसुद्धा सहभागी होऊ शकता.