From Wikipedia, the free encyclopedia
ग्वांगचोऊ (मराठी लेखनभेद: ग्वांगचौ ; चिनी: 广州 ; पीनयीन: Guangzhou ;), जुन्या काळातील अन्य नाव कांतोन (मराठी लेखनभेद: कॅंटोन ; रोमन लिपी: Canton ;) हे चिनी जनता-प्रजासत्ताकातील एक शहर असून ग्वांगदोंग प्रांताचे राजधानीचे शहर आहे. दक्षिण चीन समुद्रास मिळणाऱ्या मोती नदीच्या त्रिभुज प्रदेशात हॉंगकॉंगापासून १२० कि.मी. अंतरावर हे शहर वसले आहे. मोती नदी व दक्षिण चीन समुद्राच्या सान्निध्यामुळे ग्वांगचोऊ पूर्वीपासून महत्त्वाचे व्यापारी बंदर आहे.
ग्वांगचोऊ (इंग्रजी: Guangzhou) 广州市 |
|
उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
वरपासून : थ्यॅनहे सीबीडी भागाची आकाशरेखा, कांतोन टॉवर, मोती नदीवरील हाईचू पुलाचे झगमगते दृश्य, सुन यात्सेन स्मारक सभागृह, पाच एडक्यांचा पुतळा, युएशिउ उद्यानातला चेनहाई मनोरा, येशूच्या पवित्र हृदयाचे कथीड्रल |
|
ग्वांगचोऊचे ग्वांगदोंग प्रांतामधील स्थान | |
गुणक: 23°06′32″N 113°15′53″E |
|
देश | चीन |
राज्य | ग्वांगदोंग |
स्थापना वर्ष | १९१८ |
महापौर | छन च्यान-ह्वा |
क्षेत्रफळ | ७,४३४.४ चौ. किमी (२,८७०.४ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३७ फूट (११ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ७६,०७,२०० |
- घनता | १,०२३ /चौ. किमी (२,६५० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी + ८:०० |
http://www.gz.gov.cn |
ग्वांगचोऊ चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील तिसरे मोठे, तर देशाच्या दक्षिण भागातील सर्वांत मोठे शहर आहे. इ.स. २००० सालातील जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६० लाख, तर ग्वांगचोऊ महानगर क्षेत्राची लोकसंख्या १.१८५ कोटी होती.
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.