आसाम
भारतातील एक राज्य. From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
आसाम ईशान्य भारततील एक महत्त्वाचे व सर्वात मोठे राज्य आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |





आसामच्या उत्तरेला भूतान व अरुणाचल प्रदेश आहे. पूर्वेला नागालॅंड व मणिपूर ही राज्य आहेत. तर दक्षिणेला मेघालय, त्रिपूरा व मिझोरम ही राज्य आहेत. ईशान्य भारतातील सात राज्यांपैकी आसाम सगळ्यात मोठे राज्य आहे. आसामची लोकसंख्या ३,११,६९,२७२ एवढी आहे. असमीया ही आसामची प्रमुख भाषा आहे. आसामची साक्षरता ७३.१८ टक्के एवढी आहे. तांदूळ व मोहरी ही येथील प्रमुख पिके आहेत. बिहू नृत्य येथील लोकप्रिय नृत्य आहे. दिसपूर ही आसामची राजधानी तर गुवाहाटी सर्वात मोठे शहर आहे.
श्रावणी निलेश प्रभू
Remove ads
भूगोल
हिमालयाच्या पायथ्याशी असलेले हे राज्य ब्रह्मपुत्र व बराक नदीच्या खोऱ्यांत आहे. तसेच कर्बी ॲंगलॉंग व उत्तर कचर टेकड्यांचाही या राज्यात समावेश होतो. आसामचे क्षेत्रफळ ७८,४३८ कि.मी.२ आहे. हा विस्तार जवळजवळ आयर्लंड देशाइतका आहे.
आसाम राज्यात २३ जिल्हे आहेत.
इतिहास
प्राचीन आसाम
आसाम नावाची व्युत्पत्ती आसाममध्ये राज्य करणाऱ्या अहोम राजघराण्यामधून झाली.
मध्यकालीन आसाम
लचित बोडफुकन या हिंदू सेनापतीने इ.स.१६७१ च्या सराईघाटच्या लढाईत मुस्लिम मुघल सैन्यावर मोठा विजय मिळवला होता. यासाठी कअहोम सैन्याने भूभागाचा उत्कृष्ट वापर, वेळ घेण्यासाठी चतुर मुत्सद्दी वाटाघाटी, गनिमी रणनीती, मानसशास्त्रीय युक्ती युद्ध याद्वारे हा पराभव केला. यामुळे खिलजी च्या आक्रमणाला धक्का बसला आणि अहोम हे हिंदू साम्राज्य सुरक्षित राखले गेले. इ.स.१५८७ मध्ये हिंदू सम्राट नर नारायण यांच्या मृत्यूनंतर , कोच राज्य पश्चिम कोच बिहार आणि पूर्वेकडील कोच मध्ये विभागले गेले, त्याचा मुलगा लक्ष्मी नारायण आणि पुतणे रघुदेव यांनी राज्य केले. हे हिंदू राज्य होते.
आक्रमण आणि विजय
मीर जुमलाच्या आक्रमणामुळे विखुरलेल्या हिंदू लोकांचे योग्य पुनर्वसन करण्यात आले , अन्न आणि लष्करी उत्पादनात वाढ करण्यात आली, नवीन किल्ले बांधण्यात आले आणि लछित बरफुकन या नवीन सेनापतीच्या नेतृत्वाखाली एक मोहीम सैन्य तयार करण्यात आले. लचित बोडफुकन कालियाबोर, बोरफुकनचे जुने राज्य, त्याचा तळ तळ बनवला आणि ब्रह्मपुत्रेच्या दोन्ही तीरांसह गुवाहाटीकडे गमन केले. उत्तर किनाऱ्यावरील फुकनने सप्टेंबर १६६७ च्या सुरुवातीला बहबरी हे गाव परत मिळवले. दक्षिण किनाऱ्यावर, कपिली नदी आणि गुवाहाटी दरम्यानचे काजली, सोनापूर, पानीखैती आणि तितामारा किल्ले ताब्यात घेतले. त्यानंतर अहोम हिंदू सैन्य गुवाहाटीला पोहोचले. येथे पाच बुरूज केलेब्रह्मपुत्रेच्या प्रत्येक तीरावर (उत्तर-कनई-बोरोसी-बोवा, हिलार, हिंदुरीघोपा, पाटदुआर आणि कोराई; दक्षिण-लतासिल, जोइदुआर, धरमदुर, दुआरगुरिया आणि पांडू) रक्षण करत होते. पण शूर अहोमांनी शहराच्या उत्तरेकडील शाह बुरुझ आणि रंगमहाल किल्ले ताब्यात घेतले. इटाखुली किल्ल्यासाठी मोठी लढाई झाली. इटाखुली येथे मुघलांनी हिंदू जनतेवर मोथे अत्याचार करत हिंदूंचा छळ चालविला होता. अहोमांनी जोइदुआरला वेढा घातला, ताबा मिळवला आणि मुघलांची फौज असूनही ते इटाखुलीजवळ आले. इ.स. १६६७ च्या रात्री एक मोठा हल्ला करण्यात आला. चातुर्याने रणनीती आखून शिडीने भिंती वर चढून त्या पाडल्या गेल्या. दोन महिन्यांच्या वेढा घातल्यानंतर नोव्हेंबर १६६७ च्या मध्यात मुस्लिम सैन्याच्या ताब्यात असलेली इटाखुली पडली. यावेळी अत्याचार करत असलेल्या सैन्याचा शोधून शोधून वध केला गेला.अनेकांनी आत्मसमर्पण केले परंतु एक काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. युद्धाचा खजिना आणि युद्धसाहित्य अहोम लचित बोडफुकनच्या हाती पडले. लचित बोरफुकनचा स्वतःचा भाऊ आणि उत्तराधिकारी बोरफुकन, लालुक सोला याने १६७९ मध्ये मुघलांसाठी गुवाहाटी सोडले. १६८२ पर्यंत ते मुघलांकडे राहिले, जेव्हा गदाधर सिंहाच्या नेतृत्वाखालील हिंदू अहोमांनी ते परत मिळवले आणि कामरूपमधील मुघलांचे इस्लामिक नियंत्रण कायमचे संपवले.
आधुनिक आसाम
Remove ads
भाषा
असमीया ही आसाम मधील प्रमुख भाषा आहे.
उत्सव
बिहू हा आसाममधील महत्त्वाचा उत्सव असून कृृषीशी संबंधित विविध टप्प्यांवर वर्षभर हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.
अर्थव्यवस्था
चहा
तेल
आसामच्या समस्या
बाह्य दुवे
- आसाम सरकारचे संकेतस्थळ Archived 2006-11-28 at the Wayback Machine.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads