ऑगस्ट १५
दिनांक From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
ऑगस्ट १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२७ वा किंवा लीप वर्षात २२८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अकरावे शतक
- १०५७ - लुम्फानानच्या लढाईत स्कॉटलंडचा राजा मॅकबेथचा अंत.
तेरावे शतक
- १२६१ - मायकेल आठवा पॅलियोलोगस बायझेन्टाईन सम्राटपदी.
सोळावे शतक
सतरावे शतक
- १६०९ - इंग्लंडच्या साउधॅम्टनहून मेफ्लॉवर जहाजात इंग्लिश प्रवासी निघाले. अमेरिकेत कायमस्वरूपी युरोपियन वसाहत निर्माण करणारी ही पहिली टोळी होती.
एकोणिसावे शतक
- १८२४ - अमेरिकेतील गुलामगिरीपासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
- १८७७ - थॉमस अल्वा एडिसनने सर्वप्रथम ध्वनिमुद्रण मेरी हॅड अ लिटल लॅम्ब या बालकवितेचे केले.
विसावे शतक
- १९१४ - पनामा कालव्यातून पहिले जहाज पार झाले.
- १९२० - पोलिश-सोवियेत युद्ध-वॉर्सोची लढाई - सोवियेत संघाचा पराभव.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांचे सैनिक फ्रांसच्या दक्षिण भागात उतरले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - जपानने शरणागती पत्करली.
- १९४७ - भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९४७ - मोहम्मद अली झीणा पाकिस्तानच्या गव्हर्नर-जनरलपदी.
- १९४८ - दक्षिण कोरियाची निर्मिती.
- १९६० - काँगोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९७१ - अमेरिकेने आपल्या चलन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित केले.
- १९७१ - बहरैनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७५ - बांगलादेशमध्ये लश्करी उठाव. शेख मुजिबुर रहमान व कुटुंबियांची हत्या.
- १९९९ - अल्जीरियात दहशतवाद्यांनी २९ लोकांना ठार मारले.
एकविसावे शतक
- २००७ - पेरूजवळ पॅसिफिक महासागरात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप. ५१४ ठार, १,०९० जखमी.
Remove ads
जन्म
- १००१ - डंकन पहिला, स्कॉटलंडचा राजा.
- १७६९ - नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.
- १७९८ - सांगोली रायण्णा भारतीय योद्धा
- १८१३ - जुल्स ग्रेव्ही, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १८७२ - श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १८८६ - बिल व्हिटली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१३ - भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक.
- १९२२ - लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म.
- १९२७ - एडी लेडबीटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४५ - बेगम खालेदा झिया, बांगलादेशची पंतप्रधान.
- १९४७ - राखी गुलझार, भारतीय अभिनेत्री.
- १९५१ - जॉन चाइल्ड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५१ - रंजन गुणतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - जॅक रसेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - डेब्रा मेसिंग, अमेरिकन अभिनेत्री.
- १९७२ - बेन ऍफ्लेक, अमेरिकन अभिनेता.
- १९७५ - विजय भारद्वाज, भारतीय क्रिकेट खेळाडू.
Remove ads
मृत्यू
- १०३८ - स्टीवन पहिला, हंगेरीचा राजा.
- १०४० - डंकन पहिला, स्कॉटलंडचा राजा.
- १०५७ - मॅकबेथ, स्कॉटलंडचा राजा.
- १११८ - ऍलेक्सियस पहिला कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट.
- १९३५ - विल रॉजर्स, अमेरिकन अभिनेता.
- १९७५ - शेख मुजिबुर रहमान, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.
- २००४ - अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री.
- २००५ - बँडापुडी वेंकट सत्यनारायण भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक
- २०१८ - अजित वाडेकर, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - भारत, काँगो, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया.
- लिच्टेस्टाईन दिन - लिच्टेन्स्टेन.
- सेना दिन - पोलंड.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट १३ - ऑगस्ट १४ - ऑगस्ट १५ - ऑगस्ट १६ - ऑगस्ट १७ - ऑगस्ट महिना
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads