खुलताबाद

खुल्दाबाद From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

खुलताबाद/खुलदाबाद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेले गाव आहे. भद्र मारुती या धार्मिक स्थळासोबतच या गावात सूफी संत आणि इतर काही इतिहासकालीन राजघराण्यांतील आणि सरदार घराण्यांतील व्यक्तींच्या कबरी आहेत. हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. खुलताबाद येथे दरवर्षी ऊरूस भरतो. खुलताबाद येथे जर्जरीबक्ष दर्गा आहे.

जलद तथ्य
Remove ads

भद्रा मारूती

मुख्य पान: हनुमान मंदिरे

खुलदाबाद हे ठिकाण हिंदू दैवत भद्रा मारूती संस्थान ह्यासाठी देखील विशेष परिचित आहे.[]भद्रा मारूती ह्या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ तीन ठिकाणी आहे. त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हे असून दुसरे खुलताबाद आहे व तिसरे ठिकाण मध्य प्रदेशातील जामसावळी येथे आहे. खुलताबाद येथे दरवर्षी हनुमान जयंती निमित्त भव्य यात्रा भरते. त्या दिवशी खुलताबाद येथे हजारो लोक छत्रपती संभाजीनगर व आसपासच्या गावातून पायी चालत येतात.

Remove ads

इतिहास

भद्रसेन

इस्लामी आक्रमणाच्या आधी हे स्थळ भद्रावती नगरी म्हणून प्रसिद्ध होते. येथील राजा भद्रसेन होता. हा राजा रामभक्त होता. त्याच्या राम भक्तीमुळे येथे भद्र मारुती आला आणि राहिला अशी कथा आहे. त्यानंतर मुस्लिम आक्रमणात हे गाव उध्वस्त केले गेले. मंदिरांचा विनाश झाला आणि हिंदूंचा छळ केला गेला. तरी भद्र मारुती आणि त्याची भक्त मंडळी यांनी शूर प्रतिकार केला आणि आक्रमकांना परतवले.

सूफी संत

ह्या गावाचे नाव रौझा असेही होते; त्याचा अर्थ स्वर्गातील नंदनवन असा होतो.[ संदर्भ हवा ]. तसेच ह्या गावास संतांची दरी/भूमी किंवा शाश्वत निवासस्थान असेही संबोधले जायचे. ह्याचे कारण १४ व्या शतकात अनेक सूफी संत ह्या ठिकाणी वास्तव्यास होते व तदनंतर त्यांच्या मृत्युपश्चात त्यांचे खुलदाबाद येथेच दफन करण्यात आले.

खुलताबाद येथील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू

Thumb
मुघल सम्राट औरंगजेबची कबर
Thumb
निज़ाम-उल-मुल्क आसफजाह Iची कबर

खुलताबादमध्ये दफन करण्या आलेले सूफी संत आणि मोगल राजे

  • औरंगजेबची कबर
  • आझम शाह आणि त्याच्या पत्‍नीची कबर
  • झैन उद दिन यांची दर्गा
  • बुरहान उद दिनची मशीद
  • निझाम-उल-मुल्क असफ जाहची कबर (हैदराबाद संस्थानचे पाहिले संस्थापक)
  • बानू बेगमचा मकबरा
  • खान जहानची लाल बाग
  • मलिक अंबरची कबर
  • झर झरी झर बक्ष आणि गंज रवन गंज बक्ष दर्गे

खुलताबाद येथे छत्रपती संभाजीनगर सारखी अनेक गेट बनविण्यात आली आहेत त्यावर उर्दू फारशी या भाषेतील अनेक शिलालेख कोरण्यात आले आहेत.

Remove ads

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads