डिसेंबर २०
दिनांक From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
डिसेंबर २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५४ वा किंवा लीप वर्षात ३५५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
- १५२२ - नाइट्स ऑफ ऱहोड्सची सुलेमान द मॅग्निफिसन्टपुढे शरणागति. जीवनदान मिळालेले हे सरदार माल्टात वसले व नाइट्स ऑफ माल्टा म्हणून प्रसिद्ध झाले.
एकोणिसावे शतक
- १८०३ - लुईझियाना खरेदी पूर्ण.
- १८६० - दक्षिण कॅरोलिना युनायटेड स्टेट्सपासून फुटून निघाले.
विसावे शतक
- १९१७ - रशियात पहिल्या गुप्त पोलीस संस्थेची (चेका) स्थापना.
- १९५२ - अमेरिकन हवाई दलाचे सी.१२४ जातीचे विमान वॉशिंग्टन राज्यात मोझेस लेक येथे कोसळले. ८७ ठार
- १९७३ - स्पेनच्या पंतप्रधान ॲडमिरल लुइस कारेरो ब्लांकोचा माद्रिदमध्ये कार बॉम्बने खून.
- १९८९ - ऑपरेशन जस्ट कॉझ - अमेरिकेने पनामातील मनुएल नोरिगाचे सरकार उलथविण्यासाठी सैन्य पाठविले.
- १९९५ - नाटोचे शांतिसैन्य बॉस्नियामध्ये दाखल.
- १९९५ - अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट ९६५ हे बोईंग ७५७ जातीचे विमान कोलंबियात कालीजवळ कोसळले. १६० ठार.
- १९९९ - पोर्तुगालने मकाउचे बेट चीनला परत केले.
- १९४५ - मुंबई - बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू
- १९७१ - झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.
- १९८८ - मतदानाचे किमान वय २१वरून १८वर आणणारी ६१वी घटनादुरुस्ती संसदेत मंजूर.
- १९९४ - राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ प्रदान
एकविसावे शतक
- २००१ - आर्थिक अडचणीत सापडलेल्या आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो दिला रुआला राजीनामा देणे भाग पडले.
Remove ads
जन्म
- १५३७ - जॉन तिसरा, स्वीडनचा राजा.
- १९४० - यामिनी कृष्णमूर्ती, भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका.
- १९४२ - राणा भगवानदास, पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश.
मृत्यू
- २१७ - पोप झेफिरिनस.
प्रतिवार्षिक पालन
- मानवी ऐक्यभाव दिन.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर १८ - डिसेंबर १९ - डिसेंबर २० - डिसेंबर २१ - डिसेंबर २२ - (डिसेंबर महिना)
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads