रशिया
जगातील सर्वात मोठा देश From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
रशिया किंवा रशियन फेडरेशन हा पूर्व युरोप आणि उत्तर आशियामध्ये पसरलेला देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जगातील सर्वात मोठा देश आहे, जो अकरा टाइम झोनमध्ये पसरलेला आहे आणि चौदा देशांसह जमिनीच्या सीमा सामायिक करतो. हा जगातील नववा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि युरोपमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे. रशिया हा एक दशलक्षाहून अधिक रहिवासी असलेल्या १६ लोकसंख्येच्या केंद्रांसह एक अत्यंत शहरी देश आहे. मॅास्को ही रशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सेंट पीटर्सबर्ग हे रशियाचे दुसरे सर्वात मोठे शहर आणि त्याची सांस्कृतिक राजधानी आहे. रशियन रूबल हे रशियाचे चलन आहे. ख्रिश्चन व निधर्मी हे येथील प्रमुख धर्म आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया ही एक महासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली.
Remove ads
इतिहास
रशियन साम्राज्य

इ.स. १७२१ साली, पीटर द ग्रेटच्या अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले. इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्याने उत्तरेकडच्या महान युद्धात स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले. हे प्रदेश बाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले. बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग ही राजधानी उभारली.
पीटर द ग्रेटची मुलगी एलिझाबेथ ही पीटरनंतर गादीवर बसली. तिच्या कारकिर्दीत रशियाने सात वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकून घेतले. परंतु एलिझाबेथच्या मृत्यूनंतर तिसरा प्योत्र याने हे सर्व विभाग प्रशियाच्या ताब्यात दिले.
कॅथेरिन दुसरी किंवा "महान कॅथेरिन" हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.
सोव्हिएत रशिया
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads