मूलद्रव्य
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
एकाच प्रकारच्या (एकच अणुक्रमांक (atomic number) असलेल्या) अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य. मूलद्रव्यांचा अणुक्रमांक त्यांच्या अणूंच्या गाभ्यात असलेल्या प्रोटॉनच्या संख्येएवढा असतो.
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |

उदा० हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, लोखंड, तांबे इ.
मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू,अधातू आणि धातूसदृश्य मूलद्रव्ये असे केले जाते. धातूसदृश्य मूलद्रव्ये, धातू व अधातू या दोघांचे गुणधर्म दाखवितात. मूलद्रव्यांच्या भौतिक अवस्थेनुसार स्थायू, द्रव आणि वायू असे प्रकार पडतात. आजपर्यंत (इ.स. २०१५) ११८ मूलद्रव्यांचा शोध लागला आहे. त्यांपैकी ९२ मूलद्रव्ये निसर्गात आढळतात. ८२ किंवा त्यापेक्षा जास्त अणुक्रमांक असलेली मूलद्रव्ये अस्थिर असतात व किरणोत्सर्गाने त्यांचा ऱ्हास होतो.
Remove ads
मूलद्रव्य नावे आणि माहिती
Remove ads
मूलद्रव्यांना देशाची/प्रांताची/शहराची नावे
- अमेरिकियम (Am), कॅलिफोर्नियम (Cf), जर्मेनियम (Ge), टेनिसीन (Ts), डब्नियम (Db), निहोनियम (Nh), फ्रान्सियम (Fr), मॉस्कोव्हियम (Mc).
मूलद्रव्यांना शास्त्रज्ञांची नावे
- आइन्स्टाइनियम (Es), ऑगॅनेसॉन (Og), क्यूरियम (Cm), रुदरफोर्डियम (Rf), सीबोर्जियम., फर्मीयम (Fm), मेंडेलिवियम (Md), बोहरियम (Bh), माइटनेरियम (Mt), रॉंटजेनियम (Rg),
मूलद्रव्यांना रंगाचे नाव
- इंडियम (In), क्रोमियम (Cr), रुबिडियम (Rb),
मूलद्रव्यांना नावे देताना आवर्तसारणीतील एक ते सोळा ग्रुपमधील मूलद्रव्याच्या नावाच्या शेवटी ‘इयम’ यायला हवे, सतराव्या ग्रुपसाठी ‘इन’ यावे आणि अठराव्या ग्रुपमधील मूलद्रव्यांच्या नावाचा शेवट ऑन’ या अक्षराने व्हावा, असे ठरले होते. त्याप्रमाणे दिलेली नावे : -
जुने तात्पुरते दिलेले नाव -> सुनिश्चित केलेले अंतिम नाव
- अनुनट्रियम (Uut) -> निहोनियम (Nh)
- अनुनक्वेडियम (Uuq) -> फ्लेरोव्हियम (Fl)
- अनुनपेन्टियम (Uup) -> मॉस्कोव्हियम (Mc)
- अनुनहेक्झियम (Uuh) -> लिव्हरमोरियम (Lv)
- अनुनसेप्टियम (Uus) -> टेनिसीन (Ts)
- अनुनॉक्टियम (Uuo) -> ऑगॅनेसॉन (Og)
मूलद्रव्य विषयावरील पुस्तके
- आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया (डाॅ. व्ही.एन. शिंदे)
हे सुद्धा पहा
- आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया, डाॅ. व्ही.एन. शिंदे, अक्षर दालन प्रकाशन (२०१९)
- रासायनिक मूलद्रव्यांचा शोध, दमि. त्रिफानोव्ह व व. त्रिफानोव्ह, अनुवाद राजेंद्र सहस्त्रबुद्धे , मीर प्रकाशन मॉस्को, (१९८६)
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads