कोबाल्ट
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
कोबाल्ट (इंग्लिश: Cobalt ; मूलद्रव्य चिन्ह: Co ; ) हे अणुक्रमांक २७ असलेले धातुरूप रासायनिक मूलद्रव्य आहे. निसर्गतः हे मूलद्रव्य रासायनिक संयुगाच्या स्वरूपातच आढळते. क्षपणकारक प्रद्रावणाने, अर्थात रिडक्टिव्ह स्मेल्टिंग प्रक्रियेने, राखाडी-चंदेरी रंगाचे कोबाल्ट शुद्ध स्वरूपात निराळे काढता येते. चुंबकीय गुणधर्माचे मिश्रधातू बनवण्यासाठी, तसेच शाई, रंगद्रव्ये, व्हार्निश यांच्या उत्पादनात निळ्या रंगासाठी वापरले जाणारे कोबाल्ट अॅल्युमिनेट (रासायनिक सूत्र: CoAl2O4) बनवण्यासाठी कोबाल्टाचा उपयोग होतो. कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक व झांबिया या देशांमध्ये कोबाल्टचे जगातील सर्वाधिक उत्पादन होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Remove ads
बाह्य दुवे
- वेबएलिमेंट्स.कॉम - कोबाल्ट (इंग्लिश मजकूर)
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads