झिर्कोनियम

From Wikipedia, the free encyclopedia

झिर्कोनियम
Remove ads

(Zr) (अणुक्रमांक ४०) धातुरूप रासायनिक पदार्थ.

जलद तथ्य सामान्य गुणधर्म, साधारण अणुभार (Ar, standard) ...

प्रसिद्ध जर्मन रसायनशास्त्रज्ञ मार्टिन हेन्‍रिक क्लॅपरॉथ यांना १७८९ साली एक नवे मूलद्रव्ये सापडले. त्यांनी याचे नाव झिर्कोनियम असे ठेवले. याच्या सोनेरी, नारिंगी आणि गुलाबी रंगांच्या छटांमुळे हे खनिज अलेक्झांडर द ग्रेट याच्या काळापासून मौल्यवान खड्यात गणले गेले. अरबी भाषेतील झरकन म्हण्जे सोनेरी या शब्दावरून झिर्कोनियम हे नाव आले असावे.

Thumb
जर्मन रसायनशास्त्रज्ञ क्लॅपरॉथ

गेल्या शतकाच्या सुरुवातीस झिर्कोनियमची शुद्ध प्रत तयार करणे शक्य झाले आणि तेव्हा समजले की झिर्कोनियम सोबतच नेहमी हाफ्नियम हा धातूही असतोच आणि या वस्तुस्थितीकडे सुमारे १३० वर्षे येवढा मोठा काळ शास्त्रज्ञांचे लक्ष नव्हते. झिर्कोनियम आणि हाफ्नियम हे दोन धातू वेगळे करणे एक कठीण काम आहे. या दोन धातूंच्या रासायनिक गुणधर्मात खूपच साम्य आहे. [ अपूर्ण वाक्य]

शुद्ध झिर्कोनियमचे बाह्यस्वरूप पोलादाप्रमाणेच असते पण ते पोलादापेक्षा अधिक ताकदवान असते. झिर्कोनियम धातू अनेक प्रकारच्या दाहक माध्यमानाही दाद देत नाही. नायोबियमटायटॅनियमपेक्षा याची गंजरोधकता जास्त आहे. तर अल्कली द्रव्यांबाबतची याची गंजरोधकता टांटालमपेक्षा अधिक आहे. यामुळे मज्जासंस्थेच्या शल्यकर्मात झिर्कोनियम पासून तयार केलेला "दोरा" टाके घालण्यासाठी वापरला जात असे. तर शल्यकर्मासाठी वापरली जाणारी शस्त्रे झिर्कोनियम धातूची बनविलेली असतात.

पोलादात झिर्कोनियम मिसळल्यामुळे पोपडे पडण्याचा दोष कमी करता येऊ शकतो. बांधकामात वापरल्या जाणाऱ्या पोलादात झिर्कोनियम मिसळल्यामुळे त्याची गंजण्याची प्रवृत्ती कमी होते. हा मिश्रधातू उच्च तपमानावर तापविल्यावरही त्यावर काहीही दुष्परिणाम होत नसल्याने घडीव काम, ठोकून आकार देण्याचे काम अतिशय वेगाने करता येते. अलोह धातूंसोबत झिर्कोनियम वापरून चांगले परिणाम मिळतात. झिर्कोनियम तांबे, कॅडमियम, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, टायटॅनियम, मॉलिब्डेनम या धातूंसोबत वापरल्यावर उत्तम परिणाम दिसून येतात. आणुभट्टीमध्ये युरेनियमचा वापर अणुगर्भीय इंधन म्हणून होतो, या युरेनियमवर झिर्कोनियमचे आवरण वापरतात. झिर्कोनियम १८५०° से. वर वितळत असल्याने ते अणुभट्टीतील तापमान उत्तम प्रकारे सहन करू शकते.

झिर्कोनियमची अल्कधर्मी संयुगे रेनकोटवर दिल्या जाणाऱ्या थरांमध्ये वापरल्याने ते उत्तम प्रकारे जलरोधक बनतात, छपाईची रंगीत शाई, खास प्रकारची वॉर्निशे बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात झिर्कोनियमचा वापर मिश्र स्वरूपात होतो. तर इंजिनासाठी उच्च दर्जाचे इंधन तयार करण्यासाठी झिर्कोनियमची संयुगे उत्प्रेरक म्हणून वापरली जातात. कातडी कमाविण्याच्या कामात झिर्कोनियम-सल्फेट संयुगे वापरली जातात. सुमारे २७००° से. तापमानाला टिकणारे झिर्कोनियम डायॉक्साईड, झिर्कोनियम-बोराईड, इ. संयुगे उच्च तापमान टिकविणारे साहित्य तयार करण्यासाठी, तसेच काच तयार करण्यासाठी वापरतात.

Remove ads
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads