वसमत तालुका

From Wikipedia, the free encyclopedia

वसमत तालुका
Remove ads


वसमत हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्याचा एक तालुका आहे. वसमत ही एक मोठी बाजारपेठ आहे. वसमत शहर हे राष्ट्रीय महामार्ग 61 परभणी - नांदेड राष्ट्रीय महामार्गा वर वसलेले आहे. वसमत शहराजवळुन NH-752(I) हा राष्ट्रीय महामार्ग जातो. पूर्णा सहकारी साखर कारखाना शहरापासून 5km अंतरावर आहे. कला, वाणिज्य,विज्ञान या शाखेतील पदवी पाठ्यक्रम हु. बहिर्जी स्मारक महाविद्यालय चालवते. राज्याच्या राजधानीपासुन सुमारे 570KM व उप-राजधानीपासून सुमारे 350KM अंतरावर वसलेले आहे. कुरुंदा हे वसमत तालुक्यातील प्रसिद्ध गाव आहे.

जलद तथ्य

वसमत तालुक्यातील वाई (गोरखनाथ) येथील श्री गोरक्षनाथ महराजांचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथे पौष पौर्णिमेला यात्रा असते.

  • वसमत-परभणी रस्त्यावर, वसमतपासुन १७ कि.मी. अंतरावर आरळ हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. येथे श्री. अन्नपूर्णा मातेचे जागृत देवस्थान असून हे मंदिर हेमांद्री (हेमाडपंथी) स्थापत्यशैलीचे आहे. कालंका आईची मुर्ती भंगलेली(तोड-फोड) असल्याने श्रीदेव ओंकारनाथांनी १९४७ रोजी श्री. अन्नपूर्णा मातेची स्थापना केली. तेव्हापासून येथे दररोज अन्नदान सुरू असते. तसेच देवीला वर्षभर आलेल्या साड्या भाऊ-बीजच्या दिवशी सर्व लेकी बाळांना मोफत वाटप केल्या जातात. येथील यात्रा व पालखी उत्सव दरवर्षी माघ कृष्ण षष्टीला साजरा होतो.

वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र उभारणार आहेत. त्याचे काम चालू आहे.

Remove ads

दळणवळण वाहतूक

शहरातून राष्ट्रीय महामार्ग 61 भिवंडी ते निर्मल , राष्ट्रीय महामार्ग 752I कोपरगांव ते धानोडा तसेच राज्य महामार्ग 256 नांदेड कडे जातो. राज्य महामार्ग 255 पूर्णा कडे, राज्य महामार्ग 249 औंढा नागनाथ कडे जातो.


Remove ads

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads