वाशिम जिल्हा

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा. From Wikipedia, the free encyclopedia

वाशिम जिल्हा
Remove ads

वाशीम भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा जुलै १ १९९८ रोजी स्थापन झाला. जिल्ह्याची लोकसंख्या १०,२०,२१६ इतकी आहे. वाशीम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय वाशीम शहर आहे. ही वाकाटकांची राजधानी होती. वाशीम शहराचे प्राचीन नाव वत्सगुल्म आहे. जिल्ह्यातील मुख्य पिके- सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, तूरकापूस,ऊस,हळद ही आहेत.

जलद तथ्य
हा लेख वाशीम जिल्ह्याविषयी आहे. वाशीम शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
Thumb
विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान
Remove ads

तालुके

  1. कारंजा
  2. मंगरुळपीर
  3. मानोरा
  4. मालेगाव
  5. रिसोड
  6. वाशीम

पर्यटनस्थळे

 वाशिम तालुक्यातील वाशीम वरून उत्तरेस 5 किमी अंतरावर काटा येथे राजे वाकाटक काळातील 

नक्षीदार हेमाडपंथी शिवशक्ती मंदिर आहे; तसेच काटेपूर्णा नदीचा उगमस्थळ त्याच ठिकाणी बघावयास मिळते. नेतांसा येथील राजा रामचंद्र यांनी स्थापित केलेले काच नदीवरील प्रभू शंकराचे मंदिर अगदी निसर्गरम्य आहे. श्री संत अमरदास बाबा मंदिर ऋषीवट (रिसोड), श्री पिंगळाशी देवी (रिसोड),श्री सितलामाता मंदिर (रिसोड),आप्पास्वामी मंदिर (रिसोड), बालाजी मंदिर (वाशिम), श्री रेणुकामाता देवाळा, श्री करूनेश्र्वर मंदिर, श्री मध्यमेश्वर मंदिर, श्री क्षेत्र पोहरादेवी, पद्मतीर्थ शिवमंदिर, गणपती मंदिर हिवरा (नवसाचा गणपती) नृसिंह सरस्वती मंदिर (कारंजा), सखाराम महाराज मंदिर (लोणी), चामुंडा देवी वाशिम, गोंदेश्वर बालाजी मंदिर वाशिम,श्री जानगीर महाराज संस्थान शिरपूर जैन (मालेगाव), जैन मंदिर शिरपूर जैन (मालेगाव),आसरा माता मंदिर (पार्डी आसरा,वाशीम).

तालुक्यातील धार्मिक स्थळे

  1. कारंजा: गुरूमंदिर,जैन मंदिर,राम मंदिर
  2. रिसोड: श्री सितला मंदिर
  3. मंगरूळनाथ: श्री बिरबलनाथ महाराज मंदिर
Remove ads

भूगोल

वाशीम जिल्हाच्या पूर्वेस यवतमाळ, उत्तरेस अकोला, ईशान्येस अमरावती, पश्चिमेस बुलढाणा आणि दक्षिणेस हिंगोली हे जिल्हे आहेत. वाशीम वरून 5 किमी अंतरावरून काटेपूर्णा नदीचा उगम काटा या गावी आहे. ती नदी वाशीम च्या उत्तरेस वाहते. पैनगंगा ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. कास ही तिची मुख्य उपनदी आहे. कास नदी पैनगंगेस मसला पेन या गावा जवळ मिळते. अडाण नदी वाशीम तालुक्यात उगम पावते आणि मंगरुळपीरमानोरा तालुक्यातून वाहते. वाशीम हे खांडवा-पूर्णा रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे.

साहित्य - संस्कृती

वाशिम जिल्ह्यातील अनेक प्रतिभावंतानी विविध क्षेत्रात वाशीम जिल्ह्याचे नाव लौकिक केले असून साहित्य व संस्कृतीचा त्याला एक समृद्ध वारसा लाभला. साहित्य क्षेत्रात बाबाराव मुसळे, नारायण कुलकर्णी कवठेकर , नामदेव कांबळे , एकनाथ पवार , विलास अंभोरे, शेषराव धांडे, चाफेश्वर गांगवे, हेमंत सावळे, रवि बाविस्कर अशा अनेक लेखक व कवी, साहित्यिकांची नामावली आहे.

बाह्य दुवे

वाशीम.एनआयसी.इन

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads