समाजवादी पक्ष
भारतातील एक राजकीय पक्ष From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
समाजवादी पक्ष किंवा तत्सम नाव असलेले अनेक राजकीय पक्ष भारतात आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी समाजवादी पक्ष नावाचा पक्ष हा भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक होता.[ संदर्भ हवा ] (बाकीचे पक्ष - काँग्रेस , हिंदू महासभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मुस्लिम लीग.) पुढे प्रजापक्ष (स्थापना इ.स.१९३०, हा पुढे प्रजा संयुक्त पक्ष झाला) नावाच्या एका समान विचारसरणी असलेल्या पक्षात सामील होऊन तो प्रजासमाजवादी पक्ष तयार झाला. याही पक्षाचे लोहिया समाजवादी (प्रजा सोशालिस्ट पार्टी), संयुक्त समाजवादी, बहुजन समाजवादी, लोकदल वगैरे नावाचे अनेक तुकडे होऊन बरेच राजकीय पक्ष तयार झाले. आजही हिंदुस्थान प्रजापक्ष, भारतीय प्रजापक्ष ता नावाचे काही प्रजापक्ष अस्तित्वात आहेत.[ संदर्भ हवा ]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
आचार्य कृपलानींचा 'किसान मजदूर प्रजा पार्टी' नावाचा पक्ष होता. पुढे त्यांनी राममनोहर लोहियांच्या बरोबर 'प्रजा सोशालिस्ट पार्टी'[ संदर्भ हवा ]
जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेला समाजवादी पक्ष हा त्या तुकड्यांपैकीच एक पक्ष. हा आजही उत्तरी भारतातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. मुलायम सिंग यादव हे त्यांच्या मुलाने - अखिलेश यादव याने - पक्षातून हकालपट्टी करेपर्यंत या पक्षाचे अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ] अमरसिंग, अबू आझमी हे पक्षातील इतर महत्त्वाच्या व्यक्ती. अनेक चित्रपट अभिनेते व उद्योगपती या पक्षाचे सदस्य आहेत.[ संदर्भ हवा ] उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश या राज्यात या पक्षाचे वर्चस्व आहे. अलीकडच्या काळात मुंबईत या पक्षाने आगमन केले होते. २००८ मध्ये मराठी भाषकांच्या विरोधात या पक्षाने काही प्रक्षोभक भाषणे व भित्तिपत्रके लावल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर या पक्षाची धुमश्चक्री उडाली होती.[ संदर्भ हवा ] मुलायम सिंग यांच्या या समाजवादी पक्षात कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा ‘कौमी एकता दल’ हा पक्ष विलीन झाला आहे. (जून २०१६)[ संदर्भ हवा ]
भारतावर इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांच्या पक्षातूनच जनता पक्षाचा उदय झाला. याही राजकीय पक्षाचे यथावकाश तुकडे होऊन (नीतीशकुमार/शरद यादव यांचा) संयुक्त जनता दल, (लालूप्रसाद यादव यांचा) राष्ट्रीय जनता दल, (ओमप्रकाश चौटाला यांचा) भारतीय राष्ट्रीय लोक दल, (देवेगौडा यांचा) जनता दल (धर्मनिरपेक्ष) , शरद यादव यांचा संयुक्त जनता दल आणि (कमल मोरारका यांचा) समाजवादी जनता पक्ष, जन मोर्चा, समाजवादी पक्ष (अखिलेश यादव गट), समाजवादी पक्ष (मुलायमसिंग यादव), बहुजन समाज पक्ष (मायावती), वगैरे वगैरे अनेक पक्ष निर्माण झाले. यापैकी सहा पक्षांचे विलीनीकरण होऊन एक नवा राजकीय पक्ष उदयास येणार होता , पण ते शक्य झाले नाही.[ संदर्भ हवा ]
रामविलास पासवान, अजित सिंग, नवीन पटनायक अशा काही नेत्यांनी या नव्या पक्षापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट शिवपाल यादव यांनी ‘समाजवादी धर्मनिरपेक्ष मोर्चा’ नावाचा नवाच पक्ष स्थापन केला आहे. शिवपाल यादव यांचे वडील बंधू मुलायम सिंग यादव या पक्षाचे अध्यक्ष असतील.[ संदर्भ हवा ]
Remove ads
पक्षाचे नेते
- राष्ट्रीय अध्यक्ष- अखिलेश यादव
- राष्ट्रीय महासचिव- रामगोपाल यादव
- उत्तर प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष- नरेश उत्तम पटेल[१]
- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष- अबू आसिम आझमी
सत्रावीं लोकसभा
Remove ads
मुख्यमंत्र्यांची यादी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
Remove ads
महाराष्ट्र विधानसभा
हे सुद्धा पहा
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads