भारतातील राजकीय पक्ष

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

१५ मार्च २०१९ रोजी, भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राजकीय पक्षांच्या यादीनुसार भारतामध्ये एकूण २,३३४ राजकीय पक्ष असून, त्यापैकी ८ राष्ट्रीय पक्ष, २६ राज्यस्तरीय पक्ष आणि इतर २,३०१ नोंदणीकृत पक्ष आहेत. यापैकी महाराष्ट्रात एकूण १४५ नोंदणीकृत पक्ष आणि २ राज्यस्तरीय (मनसेशिवसेना) पक्ष आहेत.

भारतात २३३४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत. दर महिन्याला काही पक्ष नव्याने निघतात तर काही बंद पडतात.भारतीय शेतकरी कामगार पक्ष,काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय जनता पक्ष व नॅशनल पीपल्स पार्टी असे फक्त आठ राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत. जनता दल युनायटेड, अण्णाद्रमुक, द्रविड मुन्नेत्र कळ्हम, शिवसेना यांसारखे एकूण ५१ राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता आहे.

मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची संख्या हरियाणा राज्यात ६७, पंजाबमध्ये ५७, मध्य प्रदेशात ४८, आणि गुजराथमध्ये ४७ आहे.

Remove ads

राष्ट्रीय पक्ष

नोंदणीकृत पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते जेव्हा खाली सूचीबद्ध केलेल्या तीनपैकी कोणतीही एक अटी पूर्ण केली असेल:

  1. पक्षाला लोकसभेत किमान तीन वेगवेगळ्या राज्यांतून दोन टक्के जागा मिळाल्या आहे.
  2. लोकसभा किंवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत, पक्ष कोणत्याही चार किंवा अधिक राज्यांमध्ये सहा टक्के मते मिळवतो आणि त्याव्यतिरिक्त लोकसभेच्या चार जागा जिंकतो.
  3. चार राज्यांत पक्षाला राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळते.

एप्रिल २०२३ मध्ये खालीलपैकी ६ पक्ष हे राष्ट्रीय पक्ष घोशीत झाले. तेव्हाच अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षभारतीय कम्युनिस्ट पक्ष हे या यादीतून वगळण्यात आले.[]

अधिक माहिती क्र., निवडणूक चिन्ह ...
Remove ads

राज्यस्तरीय पक्ष

नोंदणीकृत पक्षाला राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली जाते, जर त्याने खाली सूचीबद्ध केलेल्या पाच अटींपैकी कोणतीही एक पूर्ण केली असेल:[]

  • एखाद्या पक्षाला राज्य विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या वैध मतांपैकी किमान सहा टक्के मते मिळाली पाहिजेत आणि त्या राज्य विधानसभेत किमान दोन जागा जिंकल्या पाहिजेत.
  • एखाद्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या वैध मतांपैकी किमान सहा टक्के मते मिळाली पाहिजेत आणि लोकसभेत किमान एक जागा जिंकली पाहिजे.
  • एखाद्या पक्षाने विधानसभेच्या एकूण जागांच्या किमान तीन टक्के किंवा किमान तीन जागा जिंकल्या पाहिजेत, जे कधीही जास्त असेल.
  • एखाद्या पक्षाने लोकसभेत प्रत्येक 25 जागांसाठी किमान 1 जागा जिंकली पाहिजे किंवा त्या राज्याला दिलेल्या कोणत्याही अंशासाठी.
  • उदारीकरणाच्या निकषांतर्गत, राज्यात मतदान झालेल्या एकूण वैध मतांपैकी आठ टक्के किंवा त्याहून अधिक मते मिळाल्यास तो राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळण्यास पात्र असेल असे आणखी एक कलम.

मान्यताप्राप्त राज्यस्तरीय किंवा प्रादेशिक पक्षांची यादी:

अधिक माहिती क्र., पक्ष ...
Remove ads

अन्य माहिती

२०१८ साली,

  • देशातील ४०४ पक्षांच्या नावात 'भारत किंवा भारतीय' हे शब्द होते.
  • देशातील १५३ पक्षांच्या नावात 'समाज' हा शब्द होता.
  • देशातील १३२ पक्षांच्या नावात 'जनता किंवा प्रजा' हे शब्द होते.
  • देशातील ५७ पक्षांच्या नावात 'आम किंवा युवा' हे शब्द होते.
  • देशातील १२ पक्षांच्या नावात 'गांधी' हा शब्द होता.
  • देशातील ६३ टक्के पक्षांच्या नावात लोकतांत्रिक, काँग्रेस किंवा आंदोलन यांपैकी एक शब्द होता.
  • देशातील ४० टक्के राजकीय पक्ष उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांत होते.
  • उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे. त्या राज्यात ४३३ राजकीय पक्ष होते, म्हणजे साडेचार लाख लोकांमागे एक पक्ष.
  • दिल्ली राज्याची लोकसंख्या १.९ कोटी आहे; त्या राज्यात २७२ राजकीय पक्ष आहेत. म्हणजे ७०,००० लोकांमागे एक पक्ष.
  • बिहारची लोकसंख्या ११ कोटी आहे, त्या राज्यात १२० पक्ष होते.
  • तामिळनाडूची लोकसंख्या ७.२ कोटी आहे, त्या राज्यात १४० राजकीय पक्ष आहेत. म्हणजे पाच लाख लोकांमागे एक पक्ष.
  • ४.९ कोटी लोकसंख्या असलेल्या आंध्र प्रदेशात ८३ पक्ष होते.

काही 'खास' नावांचे पक्ष :-

  • अखिल भारतीय गरीब पार्टी (गाझियाबाद-उत्तर प्रदेश)
  • अखिल भारतीय राष्ट्रीय परिवार पार्टी (वाराणसी-उत्तर प्रदेश)
  • अंजान आदमी पार्टी (अलाहाबाद-उत्तर प्रदेश)
  • आजादीका अंतिम आंदोलन दल (रायपूर-छत्तीसगड)
  • आधी आबादी पार्टी (लखनौ-उत्तर प्रदेश)
  • आप सबकी अपनी पार्टी (विलासपूर-छत्तीसगड)
  • आर्थिक व्यवस्था परिवर्तन पार्टी (अलाहाबाद-उत्तर प्रदेश)
  • ऑल इंडिया गांधी काँग्रेस (बंगलोर-कर्नाटक)
  • बेरोजगार आदमी अधिकार पार्टी (फरीदाबाद-हरियाणा)
  • भारत की लोक जिम्मेदार पार्टी (लखनौ-उत्तर प्रदेश)

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads