सिंगापूर

From Wikipedia, the free encyclopedia

सिंगापूर
Remove ads

सिंगापूर हे आग्नेय आशियातील मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास वसलेले द्वीपराष्ट्र आहे. विषुववृत्तापासून १३७ कि.मी. (८५ मैल) उत्तरेस असलेल्या या देशाच्या उत्तरेस मलेशियाचा जोहोर प्रांत व दक्षिणेस इंडोनेशियाची रिआउ बेटे आहेत. अवघे ७०४.० कि.मी. (२७२ वर्ग मैल) क्षेत्रफळ असलेले सिंगापूर हे जगात मोजक्या संख्येने उरलेल्या नगरराज्यांपैकी एक असून आग्नेय आशियातील सर्वात छोटे राष्ट्र आहे.
सिंगापूर बेटावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८१९ साली वखार स्थापली. त्याकाळी बेटावरील सिंगापूर नदीच्या मुखालगत मलाय कोळ्यांचीच तेवढी वस्ती होती. ओरांग लाउट जमातीतले हे स्थानिक लोक सिंगापूर बेटावर आणि नजीकच्या इतर छोट्या बेटांवर कैक वर्षांपासून नांदत आले होते. व्यूहात्मक दृष्टीकोनातून मोक्याच्या जागी वसलेले असल्यामुळे सिंगापूर मसाला मार्गावरील महत्त्वाचे केंद्र ठरू लागले; ब्रिटिश साम्राज्यातील सामरिक आणि व्यापारी महत्त्वाचे ठाणे बनले. आशियाई देशांच्या दृष्टीने सिंगापूर या शहराला सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.

जलद तथ्य महत्त्वपूर्ण घटना, क्षेत्रफळ ...
Remove ads

इतिहास

फेब्रुवारी ६, १८१९ रोजी सर थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्सने सिंगापूर शहराची स्थापना केली.

फेब्रुवारी १५ १९४२ या दिवशी सिंगापुरात ब्रिटिश सैन्याने जपानी सैन्यासमोर शरणागती पत्करली. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.

नावाची व्युत्पत्ती

सिंगापूर हे आजचे इंग्रजी नाव मूळ मलय सिंगपूरा वरून आले. यातला सिंग हा संस्कृत सिंह आणि पुरा हे संस्कृत पुरमचे स्थानिक रुप असल्याचे मानले जाते. म्हणजेच सिंहपुरम या मूळ नावाचे रूप बदलत जाऊन ते सिंगापूर झाले आहे.

Thumb
ली कुआन यू, सिंगापूरचे पहिले पंतप्रधान
Remove ads

भूगोल

सिंगापुरात मुख्य भूमी धरून ६३ बेटे आहेत. दोन मानवनिर्मित पुलांद्वारे सिंगापूर मलाय द्वीपकल्पाला जोडले आहे. जोहोर-सिंगापूर कॉजवे हा पूल सिंगापुराला उअत्तरेकडच्या जोहोर नावाच्या मलेशियन प्रांताला जोडतो; तर तुआस सेकंड लिंक हा पूल पश्चिमेकडून जोहोरला जोडतो. जूरोंग बेट, पुलाउ तेकोंग, पुलाउ उबिनसेंटोसा ही सिंगापुराची प्रमुख बेटे आहेत. सिंगापूर बेटावरील बराचसा भाग समुद्रसपाटीलगतच असून बुकित तिमा ही १६६ मी. (५४५ फूट) उंची असलेली टेकडी देशातील सर्वात उंच ठिकाण आहे.

Thumb
सिंगापूर येथे कॅनेडियन आंतरराष्ट्रीय शाळा

चतु:सीमा

राजकीय विभाग

Remove ads

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

सिंगापूर मधील बहुसंख्य लोक बौद्ध धर्मीय आहेत. याशिवाय तेथे हिंदु, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीय सुद्धा राहतात.

शिक्षण

भाषा

Thumb

ऐतिहासिक वारश्याने मलाय ही सिंगापुरातील महत्त्वाची भाषा आहे. सिंगापूर प्रजासत्ताकाचे राष्ट्रगीत ’माजुला सिंगापुरा’ हेदेखील याच भाषेत आहे. सिंगापूर प्रजासत्ताकाच्या चार अधिकृत भाषा आहेत: इंग्लिश, मलाय, मँडरिन चिनी, तमिळ. स्वातंत्र्यानंतर सिंगापूर सरकाराने अधिकृत प्रशासकीय व्यवहारात इंग्लिश भाषेचा पुरस्कार करण्याचे धोरण अवलंबले. सर्वसाधारणतः सर्व सरकारी पत्रके, दस्तऐवज इंग्लिश भाषेत जारी केले जातात; परंतु इतर भाषांतही बहुसंख्य पत्रके, दस्त भाषांतरित केले जातात. शिक्षणातही इंग्लिश ही ’प्रथम भाषा’ म्हणून शिकवली जाते व उर्वरित तीन अधिकृत भाषांपैकी एक भाषा ’द्वितीय भाषा’ म्हणून शिकता येते.
इंग्लिशखेरीज मँडरिन चिनी ही भाषिकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाची मोठी भाषा आहे. सुमारे ७०% सिंगापुरी जनता द्वितीय भाषा म्हणून मँडरिन चिनी वापरते.

संस्कृती

सांस्कृतिकदृष्ट्या सिंगापुर या शहराला एक वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे भारतातून तसेच जगभरातून लाखो लोक दरवर्षी सिंगापूरला पर्यटन च्या निमित्ताने भेट देतात परंतु बुद्धांचा दात असलेले भव्य बुद्ध मंदिर मात्र अपवादानेच असलेले याठिकाणी पाहिले जाते बहुसंख्य भारतीय पर्यटकांना असे एक मंदिर येथे आहे याची फारशी माहिती नाही सिंगापूरच्या चायनाटाउन परिसरात बुद्धा भूत रेलिक हे अति भव्य मंदिर आहे मंदिर पाच मजली असून पूर्णपणे लाकडी आहे हे मंदिर म्हणजे चिनी स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना मानला जातो मंदिर उभारण्यासाठी लाकडी इंटरलॉकिंग बॉक्सचे तंत्रज्ञान वापरले असून हे तंत्रज्ञान म्हणजे चीनने जगाला दिलेली देणगी समजली जाते आपल्याकडील मंदिरात जसे रक्षक किंवा द्वारपाल असतात तसेच दोन द्वारपाल याही मंदिराच्या प्रवेशद्वाराशी आहेत या दोन्ही द्वारपाल यांचे चेहरे उग्र असून कोणत्याही शक्तीशी लढाई करण्यास तयार असल्यासारखे वाटतात प्रवेशद्वारात श्रीलंके होऊन आणलेले नागपुष्पाची चार झाडे आहेत नागपुष्पाच्या झाडाखालीच बुद्ध मैत्रीय यांना ज्ञान प्राप्त होणारा अशी अख्यायिका आहे त्यामुळे या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे पहिल्या मजल्यावरील दालनात बुद्ध मैत्रेय यांची 15 फुटी अखंड पाषाणात घडविलेली सुबक मूर्ती आहे या पूर्ण दालनाची रचना राजवंशी आहे बुद्ध मैत्री म्हणजे बौद्ध परंपरेनुसार भविष्य बुद्ध मैत्रेय बुद्धांचा भविष्यात जन्म होणार असून त्यांना गौतम बुद्धांचे वंशज मानले गेलेले आहे सुद्धा मूर्ती भद्रासन आत असून तिचे पाय कमळावर आहेत अभय मुद्रेतील उजवा हात आणि डाव्या हातात सुवर्ण अमृतकुंभ आहे या दालनाला 100 नाग दालन असे म्हणले जाते या दालनाच्या दोन्ही बाजूला बुद्धांच्या विविध मुद्रा असलेल्या 100 अतिशय सुबक मूर्ती आहेत सर्व बोलत्या पद्मासनात असून कमळावर बसलेले आहेत या मुर्त्या लाकडात घडवलेल्या आहेत याच दालनात भाविक बुद्धांची आराधना करतात

Remove ads

प्रशासन व राजकारण

Thumb
पार्लमेंट हाउस

सिंगापुरात वेस्टमिन्स्टर व्यवस्थेवर आधारित संसदीय लोकशाही आहे. विविध मतदारसंघांचे प्रतिनिधित्व असणारी एकसभागृही संसद प्रशासनाचे कायदेमंडळ म्हणून काम करते. प्रशासनाचे बहुशः कार्यकारी अधिकार पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाखालील कॅबिनेट मंत्रिमंडळाकडे असतात. प्रशासनाच्या सर्वोच्चपदी असणारे सिंगापुराचे राष्ट्राध्यक्ष यांचे पद सर्वोच्च मानाचे असले तरीही अकार्यकारी स्वरूपाचे असते. मात्र इ.स. १९९१ पासून राष्ट्रीय राखीव निधीचा वापर व न्यायव्यवस्थेतील पदनियुक्त्यांबाबत नकाराधिकार वापरण्याचे अधिकार राष्ट्राध्यक्षांना बहाल करण्यात आले आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची लोकमतानुसार निवडणूक घेण्याची घटनात्मक तरतूद असली तरीही इ.स. १९९३ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता आजवर या पदावरील नेमणुका बिनविरोध निवडीनुसारच झाल्या आहेत. आर्थिक दृष्ट्या व प्रशासकीय दृष्ट्या सिंगापूर या शहराला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे जगभरातील पर्यटक या छोट्याशा देशाकडे आकर्षित झालेले आहे

Remove ads

प्रजासत्ताक सिंगापूर

मलेशिया पासून बेदखल झाल्यानंतर ९ ऑगस्ट १९६५ ला स्वतंत्र प्रजासत्ताक सिंगापूर देशाची स्थापना झाली आणि ली कुआन यू हे सिंगापूरचे पहिले पंतप्रधान झाले.

अर्थतंत्र

सिंगापूरची अर्थव्यवस्था हि व्यापार आधारित अत्यंत विकसित भांडवली अर्थव्यवस्था आहे. सिंगापूरमध्ये अमेरिका, जपान आणि युरोपातील ७००० बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. सन १९६५ ते १९९५ दरम्यान सिंगापूरची अर्थव्यवस्था दरवर्षी सरासरी ६ टक्के दराने विकसित झाली व त्यामुळे सिंगापूरच्या लोकांच्या राहणीमानात अमुलाग्र सुधारणा झाली. सिंगापूरची अर्थव्यवस्था जगातील सर्वात खुल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.

संदर्भ

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads