डिसेंबर १२
दिनांक From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
डिसेंबर १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४५ वा किंवा लीप वर्षात ३४६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सातवे शतक
- ६२७ - निनेवेहची लढाई - हेराक्लियसच्या बायझेन्टाईन सैन्याने खुस्रो दुसऱ्याच्या पर्शियन सैन्याला हरविले.
अकरावे शतक
- १०९८ - पहिली क्रुसेड - मा'अरात अल् नुमानची कत्तल - शहराची तटबंदी फोडून क्रुसेडर आत घुसले व २०,००० रहिवाश्यांची कत्तल उडविली. शहरात पुरेसे अन्न न मिळाल्याने त्यांनी मानवमांस खाल्ले.
अठरावे शतक
- १७५५: डच इस्ट इंडिया कंपनीने पहिल्यांदा निकोबार बेटांमध्ये प्रवे केला.
- १७१९ - बॉस्टन गॅझेटचे प्रकाशन.
- १७८१ - अमेरिकन क्रांती-उशान्तची दुसरी लढाई - रिअर ॲडमिरल रिचर्ड केम्पेनफेल्टच्या एच.एम.एस.व्हिक्टरी या युद्धनौकेच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश नौदलाच्या स्क्वॉड्रनने फ्रेंच तांड्याला हरविले.
- १७८७ - पेनसिल्व्हेनिया अमेरिकेचे संविधान मान्य करणारे दुसरे राज्य ठरले.
विसावे शतक
- १९०१ - न्यू फाउंडलंडमधील सेंट जॉन गावातील सिग्नल हिल येथे गुग्लियेल्मो मार्कोनीने प्रथम अटलांटिक महासागरापलीकडचा रेडियो संदेश पकडला.
- १९११ - ब्रिटिश ईस्ट ईंडीया कंपनीने भारताची राजधानी कोलकातायेथून दिल्लीला हलविली.
- १९२५ - इराणच्या मजलिसने रझा खानची शाहपदी निवड केली.
- १९३९ - हिवाळी युद्ध-तोल्वाजार्विची लढाई - फिनलंडच्या सैन्याने प्रथम सोवियेत युनियनविरूद्ध विजय मिळविला.
- १९४१ - ब्रिटनने बल्गेरियाविरूद्ध युद्ध पुकारले.
- १९६३ - केन्याला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य मिळाले.
- १९६४ - जोमो केन्याटा केन्याच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९७९ - ऱहोडेशियाचे नामांतर. नवीन नाव झिम्बाब्वे.
- १९८५ - ऍरो एर फ्लाइट १२८५ हे डी.सी.८ जातीचे विमान न्यू फाउंडलंडमधील गॅन्डर विमानतळावरून उडताच कोसळले. २५६ ठार. मृतांमध्ये अमेरिकेच्या १०१व्या एरबॉर्न डिव्हिजनचे २४८ सैनिक.
- १९९० - पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला.
- २००१ - भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी.
- २००० - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश राष्ट्राध्यक्षपदी.
Remove ads
जन्म
- १२९८ - ऑस्ट्रियाचा आर्चड्यूक आल्बर्ट दुसरा.
- १५७४ - डेन्मार्कची ऍन, इंग्लंडचा राजा जेम्स पहिला याची राणी.
- १८७२ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.
- १८९२ - गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’’धूमकेतू’’, गुजराती कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे.
- १९०२ - अ. ना. भालेराव, संपादक व मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक.
- १९०५ - डॉ. मुल्कराज आनंद, हिंदी लेखक.
- १९०७ - खेमचंद प्रकाश, भारतीय संगीतकार
- १९४० - शरद पवार, भारतीय राजकारणी,केंद्रीय कृषी मंत्री, संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
- १९४१ - गोपीनाथ मुंडे, भारतीय राजकारणी,केंद्रीय मंत्री,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
- १९५० - रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, भारतीय अभिनेता.
- १९८१ - युवराजसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
Remove ads
मृत्यू
- ८८४ - कार्लोमान, पश्चिमी फ्रॅंक्सचा राजा.
- १५७४ - सलीम दुसरा, ऑटोमन सुलतान.
- १६८५ - जॉन पेल, ब्रिटिश गणितज्ञ.
- १८४३ - विल्यम पहिला, नेदरलॅंड्सचा राजा.
- १९१३ - मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा सम्राट.
- १९३० - बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना.
- १९६४ - मैथिलिशरण गुप्त, हिंदी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली.
- १९९१ - दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर, शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष (१९६३ - १९६६)
- १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक.
- १९९२ - जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- २००० - जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल, कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (३१ मे १९९६ - ७ ऑक्टोबर १९९९)
- २००४ - निरंजन उजगरे, मराठी कवी.
- २००५ - रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माते
- २०१५ - शरद जोशी, महाराष्ट्रातील शेतकरी नेता.
प्रतिवार्षिक पालन
- केन्या - स्वातंत्र्य दिन.
- स्वदेशी दिन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर १२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर १० - डिसेंबर ११ - डिसेंबर १२ - डिसेंबर १३ - डिसेंबर १४ - (डिसेंबर महिना)
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads