एप्रिल १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०० वा किंवा लीप वर्षात १०१ वा दिवस असतो.
विसावे शतक
- १९०६ - द फोर मिलियन, ओ. हेन्रीचा दुसरा लघुकथांचा संग्रह प्रकाशित.
- १९१२ - टायटॅनिक जहाजाचा पहिला आणि शेवटचा प्रवास सुरू झाला.
- १९४४ - हेन्री फोर्ड दुसरा याची फोर्ड मोटर कंपनीचा उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिडेंट) म्हणून नेमणूक.
- १९५३ - मोठ्या प्रमाणात प्रदर्शित झालेला पहिला रंगीत त्रिमितीय (3D) चित्रपट हाऊस ऑफ वॅक्स प्रदर्शित झाला.
- १९५५ - योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.
- १९७२ - जैविक अस्त्रांच्या निर्मितीवर बंदी आणणारा पहिला करार ७४ देशांनी स्वीकारला.
- १९८२ - भारताच्या पहिल्या कृत्रिम उपग्रह इन्सॅट १एचे प्रक्षेपण
- १९९८ - उत्तर आयर्लंड आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात शांतता करार.
- १९९१ - कृत्रिम उपग्रहांचा वापर करून चक्रीवादळाचे पहिल्यांदा निरीक्षण केले गेले.
- १३८९ - कोसिमो दि मेदिची, फ्लोरेन्सचा राज्यकर्ता.
- १६५१ - एह्रेनफ्रीड वॉल्थर फॉन त्शिर्नहौस, जर्मन गणितज्ञ.
- १७५५ - सामुएल हानेमान , होमिओपॅथीचे जनक
- १७९४ - मॅथ्यू पेरी, अमेरिकन दर्यासारंग.
- १८२९ - विल्यम बूथ, साल्व्हेशन आर्मीचा संस्थापक.
- १८४३ - रामचंद्र गुंजीकर, विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक.
- १८४७ - जोसेफ पुलित्झर, हंगेरियन-अमेरिकन राजकारणी, पत्रकार.
- १८८० - मोहम्मद नादिर शाह, अफगाणिस्तानचा राजा.
- १८८० - सर सी.वाय. चिंतामणी, पत्रकार आणि उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री
- १८९४ - घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती.
- १८९७ - प्रफुल्लचंद्र सेन, भारतीय राजकारणी.
- १९०१ - डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ, अर्थशास्त्रज्ञ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू.
- १९०७ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार.
- १९१७ - रॉबर्ट बर्न्स वूडवार्ड, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
- १९३१ - किशोरी आमोणकर, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका.
- १९३२ - ओमर शरीफ, इजिप्तचा चित्रपटअभिनेता.
- १९५१ - स्टीवन सीगल, अमेरिकन चित्रपटअभिनेता.
- १९५२ - नारायण राणे, भारतीय राजकारणी.
- १९८४ - मॅंडी मूर, अमेरिकन चित्रपटअभिनेत्री.
- १९८८ - हेली ज्योएल ऑस्मेंट, अमेरिकन चित्रपटअभिनेता.
महाराष्ट्र शासनाचा 'भूमी अभिलेख' दिन.