From Wikipedia, the free encyclopedia
आतिशी मारलेना ह्या दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आहेत. दिल्लीचा मुख्यमंत्री हा भारताच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशाचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार केवळ दिल्ली व पुडुचेरी ह्या दोन केंद्रशासित प्रदेशांनाच स्वतःचे सरकार बनवण्याची संमती आहे. भारताच्या राज्यांमध्ये राज्यप्रमुख राज्यपाल असतो परंतु दिल्ली व पुडुचेरीमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात नसून उपराज्यपालाची निवड भारताचे राष्ट्रपती करतात. परंतु दिल्लीची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला उपराज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
१९५२ सालापासून आजवर ८ व्यक्ती दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत.
क्रम | नाव[1] | पदावरील काळ (कार्यकाळ) | पक्ष[lower-alpha 1] |
---|---|---|---|
१ | चौधरी ब्रह्म प्रकाश | १७ मार्च १९५२ – १२ फेब्रुवारी १९५५ (२ वर्षे, ३३२ दिवस) |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
२ | गुरुमुख निहाल सिंग | १२ फेब्रुवारी १९५५ – १ नोव्हेंबर १९५६ (१ वर्ष, २६३ दिवस) | |
पद बरखास्त, १९५६–१९९३ | |||
३ | मदनलाल खुराणा | २ डिसेंबर १९९३ – २६ फेब्रुवारी १९९६ (२ वर्षे, ८६ दिवस) |
भारतीय जनता पक्ष |
४ | साहिबसिंग वर्मा | २६ फेब्रुवारी १९९६ – १२ ऑक्टोबर १९९८ (२ वर्षे, २२८ दिवस) | |
५ | सुषमा स्वराज | १२ ऑक्टोबर १९९८ – ३ डिसेंबर १९९८ (० वर्षे, ५२ दिवस) | |
६ | शीला दीक्षित | ३ डिसेंबर १९९८ – २८ डिसेंबर २०१३ (१५ वर्षे, २५ दिवस) | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
७ | अरविंद केजरीवाल | २८ डिसेंबर २०१३ – १४ फेब्रुवारी २०१४ (० वर्षे, ४९ दिवस) | आम आदमी पार्टी |
- | राष्ट्रपती राजवट | १४ फेब्रुवारी २०१४ – १४ फेब्रुवारी २०१५ (१ वर्ष, ० दिवस) | – |
(७) | अरविंद केजरीवाल | १४ फेब्रुवारी २०१५ – १७ सप्टेंबर २०२४ (९ वर्षे, २१६ दिवस) | आम आदमी पार्टी |
८ | आतिशी मारलेना | १७ सप्टेंबर २०२४ - विद्यमान (० वर्षे, ७ दिवस) | आम आदमी पार्टी |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.