मानवी विकास निर्देशांक
आयुर्मान, शिक्षण आणि उत्पन्न निर्देशांकांची एकत्रित आकडेवारी / From Wikipedia, the free encyclopedia
मानवी विकास निर्देशांक हा आकडा जगातील देशांचे विकसित, विकसिनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.
0.800–1.000 (very high)
0.700–0.799 (high) 0.550–0.699 (medium) |
0.350–0.549 (low) Data unavailable |
इ.स. १९९० साली पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन ह्यांनी मानवी विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रांची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते.महबूब् उल हक यांना "मानव विकास निर्देशाकाचे जनक" म्हणून संबोधले जाते.[2][3][4]
१९९० पहिल्या मानवी विकास अहवालात मानवी कल्याणासाठी प्रगती करण्याचा एक नवीन दृष्टीकोन सादर केला.१९९० मध्ये पहिला मानवी विकास अहवाल प्रकाशित करण्यात आला.