व्हियेतनाम
आग्नेय आशियातील एक देश / From Wikipedia, the free encyclopedia
व्हियेतनाम (लेखनभेद: व्हिएतनाम) हा आग्नेय आशियातील एक देश आहे. व्हिएतनामच्या उत्तरेस चीन, पश्चिमेस लाओस व कंबोडिया हे देश तर पूर्वेस व दक्षिणेस दक्षिण चीन समुद्र आहेत. २०२० नुसार, सुमारे ९.७८ कोटी लोकसंख्या असलेला व्हिएतनामचा ह्या बाबतीत जगात १३ वा तर आशिया खंडात आठवा क्रमांक आहे. हनोईही व्हिएतनामची राजधानी तर हो चि मिन्ह सिटी (जुने नाव: साईगोन) हे येथील सर्वात मोठे शहर आहे. बौद्ध धर्म हा या देशाचा मुख्य धर्म असून देशाची ८५% (८.३१ कोटी) लोकसंख्या ही बौद्ध आहे.
व्हिएतनाम Cộng hòa Xã hội Chủ nghĩa Việt Nam व्हिएतनामचे साम्यवादी प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: Độc lập - Tự do - Hạnh phúc "स्वातंत्र - आजादी - सुख" | |||||
राष्ट्रगीत: "लष्कराची कूच" (first verse) | |||||
व्हिएतनामचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | हनोई | ||||
सर्वात मोठे शहर | हो चि मिन्ह सिटी | ||||
अधिकृत भाषा | व्हिएतनामी | ||||
सरकार | मार्क्सवादी-लेनिनवादी साम्यवादी एक-पक्षीय राष्ट्र | ||||
- राष्ट्रप्रमुख | ट्रुओंग टॅन सांग | ||||
- पंतप्रधान | न्विन टॅन डुंग | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
निर्मिती | |||||
- चीनपासून स्वातंत्र्य | इ.स. ९३८ | ||||
- फ्रान्सपासून स्वातंत्र्य | २ सप्टेंबर १९४५ | ||||
- एकत्रीकरण | २ जुलै १९७६[1] | ||||
- संविधान | १५ एप्रिल १९९३ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ३,३१,२१० किमी२ (६५वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ६.४ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ९,७७,९०,००० (१३वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | २६५/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ३२०.८७४ अब्ज अमेरिकन डॉलर (३६वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ३,५४९ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.५९३[2] (मध्यम) (१२८ वा) (२०११) | ||||
राष्ट्रीय चलन | डाँग | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी + ७:०० | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | VN | ||||
आंतरजाल प्रत्यय | .vn | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ८४ | ||||
इ.स. ९३८ साली साम्राज्यवादी चीनपासून व्हिएतनामला स्वातंत्र्य मिळाले. १९व्या शतकाच्या अखेरीस फ्रेंचांनी ह्या भूभागावर आक्रमण करून येथे फ्रेंच इंडोचीन ही वसाहत निर्माण केली. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर झालेल्या पहिले इंडोचीन युद्धामध्ये हो चि मिन्हच्या नेतृत्वाखाली व्हिएतनामी सैन्याने फ्रान्सचा पराभव केला. १९५४ साली व्हिएतनामचे उत्तर व दक्षिण असे दोन तुकडे करण्यात आले. मात्र एकत्रीकरणावरून पुन्हा झालेल्या व्हिएतनाम युद्धात उत्तरेची सरशी झाली व १९७६ साली व्हिएतनाम पुन्हा एकदा एकसंध बनला. पुढील एक दशक सोव्हिएत संघाच्या छत्रछायेत दारिद्र्य व एकाकीपणात काढल्यानंतर व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाने अनेक आर्थिक व राजकीय सुधारणा हाती घेतल्या.