नॉर्वे

उत्तर युरोपातील एक उत्तरी देश From Wikipedia, the free encyclopedia

नॉर्वे
Remove ads

नॉर्वे (नॉर्वेजियन: Norge) हा उत्तर युरोपातील एक देश आहे. स्कॅंडिनेव्हियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात वसलेल्या नॉर्वेच्या सीमेचा मोठा हिस्सा स्वीडन देशासोबत आहे तर फिनलंडरशिया देश नॉर्वेच्या अतिउत्तर सीमेवर आहेत. पश्चिम व दक्षिणेस नॉर्वेजियन समुद्रउत्तर समुद्र आहेत. स्वालबार्डयान मायेन हे आर्क्टिक महासागरामधील द्वीपसमूह नॉर्वेच्या अधिपत्याखाली आहेत. ओस्लो ही नॉर्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सध्या नॉर्वेमध्ये संविधानिक राजेशाही व सांसदीय लोकशाही आहे. हाराल्ड पाचवा हे येथील विद्यमान राजे आहेत.

जलद तथ्य महत्त्वपूर्ण घटना, क्षेत्रफळ ...

अत्यंत विकसित व समृद्ध असलेला नॉर्वे देश दरडोई उत्पन्नामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.[][][] नॉर्वे हा जगातील पाचव्या क्रमांकाचा खनिज तेल उत्पादक आहे. नॉर्वेचा मानवी विकास निर्देशांक जगात सर्वाधिक आहे.[]

नॉर्वे देशातील नागरिक जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेने सर्वात जास्त पुस्तके वाचतात. आणि ते दरवर्षी सरासरी पाच हजार रुपये आपल्या पुस्तकावर खर्च करतात.

जर तुम्ही नॉर्वेमध्ये एखादे चांगले पुस्तक लिहिले तर सरकार त्याच्या एक हजार कॉपी खरेदी करून आपल्या लायब्ररीमध्ये ठेवते. येथे दरवर्षी दोन हजार पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित होतात.

नॉर्वेमध्ये पुरुषांसाठी दोन नावे खूप प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे Odd आणि दुसरे म्हणजे Even.

Remove ads

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads