बोलिव्हिया

From Wikipedia, the free encyclopedia

बोलिव्हिया
Remove ads

बोलिव्हिया (स्पॅनिश: Estado Plurinacional de Bolivia)[][] हा दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोलिव्हियाच्या उत्तरेला व पूर्वेला ब्राझिल, दक्षिणेला पेराग्वेआर्जेन्टिना तर पश्चिमेला चिलीपेरू हे देश आहेत. ला पाझ ही बोलिव्हियाची राजधानी तर सान्ता क्रुझ हे सर्वात मोठे शहर आहे.

जलद तथ्य महत्त्वपूर्ण घटना, क्षेत्रफळ ...

ऐतिहासिक इंका साम्राज्याचा भाग असलेला बोलिव्हिया इ.स. १५२४ ते इ.स. १८२५ दरम्यान स्पॅनिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. स्वातंत्र्यानंतरच्या काळात येथे अनेक दशके राजकीय व आर्थिक अस्थैर्य व लष्करी राजवट होती. गेल्या २०० वर्षांमध्ये शेजारी देशांसोबत झालेल्या लढायांमध्ये बोलिव्हियाने जवळजवळ अर्धा भूभाग गमावला आहे.

सध्या लोकशाही प्रजासत्ताक असलेल्या बोलिव्हियाच्या अंदाजे १ कोटी लोकसंख्येपैकी ६०% जनता दरिद्री आहे. बोलिव्हिया हा लॅटिन अमेरिकेमधील सर्वात गरीब व अविकसित देशांपैकी एक आहे. ह्या भागातील इतर देशांप्रमाणे येथे देखील श्रीमंत व गरीब लोकांच्या आर्थिक उत्पनांत प्रचंड तफावत आहे.

Remove ads

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

Thumb
उयुनी मिठागरे

चतुःसीमा

राजकीय विभाग

बोलिव्हिया ९ डिपार्टमेंटमध्ये विभागलेला आहे --

  1. पांदो
  2. ला पाझ
  3. बेनी
  4. ओरुरो
  5. कोचाबाम्बा
  6. सांता क्रुझ
  7. पोतोसी
  8. चुक्वीसाका
  9. तारिहा

मोठी शहरे

बोलिव्हियातील दोन तृतियांश लोक शहरांमधून राहतात.[]

सुक्रे ही देशाची राजधानी आहे तर ला पाझ हे प्रशासकीय केंद्र आहे.

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

२००१ च्या जनगणनेनुसार बोलिव्हियाची लोकसंख्या ८२,७४,३२५ इतकी होती. २०१२ मध्ये ही वाढून १,००,५९,८५६ झाली.[]

धर्म

मुख्य लेख: बोलिव्हियामधील धर्म

बोलिव्हियामधील धर्म (२०१४)[१०]

  इतर (3%)
Thumb
ला पाझमधील बेसिलिका दे सान फ्रांसिस्को

बोलिव्हिया संविधानानुसार धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.[११]

ख्रिश्चन धर्मीय सूत्रांनुसार ९२.५% बोलिव्हियानो लोक ख्रिश्चन धर्मातील कोणत्यातरी पंथाचे आहेत. ३.१% स्थानिक धर्म पाळणारे तर २.२% बहाई धर्मीय आहेत. १.९& निधर्मी तर ०.१% इतर धर्मीय आहेत.[१२]

२००१ च्या जनगणनेनुसार बोलिव्हियातील लोकसंख्येपैकी ७८% व्यक्ती कॅथोलिक, १९% प्रोटेस्टंट तर ३% इतरधर्मीय होते. काही लोक ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चचे अनुयायी होते..[१३][१४]

स्थानिक धर्म पाळणारे लोक ख्रिश्चन धर्मातील संकल्पना पू्र्वापार पासून असलेल्या आपल्या धर्मांमध्ये मिसळतात. हे कोपाकबानाची कुमारिका, उर्कुपिनाची कुमारिका आणि सोकोव्होनची कुमारिका यांना वंदनीय मानतात.[१५] पचामामा पंथाचे अनुयायी पृथ्वीला माता समजतात. पाचामामा पंथीय लोक पृथ्वीला माता समजतात.[१६] तितिकाका सरोवराच्या आसपास राहणारे अयमारा लोक झेबेडीचा मुलगा जेम्स याचे भक्त असतात.[१७] याशिवाय अयमारा लोक एकेको या देवाची पूजा करतात तर ग्वारानी लोक तुपा देवाची पूजा करतात.

शिक्षण

चित्र:Universidad Mayor Real y Pontificia de San Francisco Xavier de Chuquisaca1.jpg
उनिव्हर्सिदाद मायोर रेआल इ पाँतिफिसिया सान फ्रांसिस्को हाविये दि चुसक्विसाका ही बोलिव्हियामधील सगळ्यात जुनी शैक्षणिक संस्था आहे.

२००८मध्ये बोलिव्हियाने स्वतःला पूर्ण साक्षर जाहीर केले.[१८]

संस्कृती

खेळ

बोलिव्हियामध्ये फुटबॉल सगळ्यात लोकप्रिय खेळ आहे. रॅकेटबॉलसुद्धा येथे लोकप्रिय आहे. पॅन अमेरिकन खेळांमधील बोलिव्हियाच्या १८ पदकांपैकी १५ रॅकेटबॉलमधील होती. पोतोसी प्रांतात बास्केटबॉल लोकप्रिय आहे.

राजकारण

अर्थतंत्र

वाहतूक

महामार्ग

रेल्वे

विमानसेवा

बोलिव्हियाना दि आव्हियासियाँ ही देशातील सगळ्यात मोठी विमानवाहतूक कंपनी आहे. देशाची ध्वजवाहक असलेल्या या कंपनीची मालकी पूर्णपणे सरकार कडे आहे. लिनिआ अॅरिया आमास्झोनस ही खाजगी विमानकंपनी देशांतर्गत आणि निवडक आंतरराष्ट्रीय शहरांना सेवा देते.

ला पाझमधील एल आल्तो आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांता क्रुझमधील विरु विरु आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कोचाबाम्बामधील होर्हे विल्स्टरमान आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सगळ्यात मोठे तीन विमानतळ आहेत.

Remove ads

बाह्य दुवे

जलद तथ्य

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads