मध्य आशिया

आशियातील उपप्रदेश From Wikipedia, the free encyclopedia

मध्य आशिया
Remove ads

मध्य आशिया हा आशिया खंडामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. इतर भौगोलिक प्रदेशांप्रमाणे मध्य आशियाच्या अनेक व्याख्या आहेत. सर्वसाधारणपणे मध्य आशियामध्ये आशियाच्या पश्चिम भागातील युरोपाच्या सीमेजवळील भूभागाचा समावेश केला जातो. ह्यांमध्ये भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर स्वतंत्र झालेले कझाकस्तान, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तानतुर्कमेनिस्तान हे देश येतात. ह्या देशांची एकत्रित लोकसंख्या सुमारे ६.१५ कोटी इतकी आहे.

जलद तथ्य क्षेत्रफळ, लोकसंख्या ...


काही व्याख्यांनुसार दक्षिण आशियातील अफगाणिस्तानइराण तर पूर्व आशियातील मंगोलिया हे देश तसेच पाकिस्तानचा उत्तर भाग, भारताचा काश्मीर, चीनमधील शिंच्यांग हा प्रदेश व दक्षिण सायबेरिया देखील मध्य आशियामध्ये गणले जातात.

Remove ads

भूगोल

Thumb
संयुक्त राष्ट्रांच्या व्याख्येनुसार आशियाचे भौगोलिक प्रदेश:
  मध्य आशिया

मध्य आशियाच्या भौगोलिक रचनेमध्ये पर्वतरांगा (तियान शान), वाळवंटे (कारा कुम, किझिल कुम, ताक्लामकान) व वृक्षरहित गवताळ पठारांचा समावेश होतो. सीर दर्या, अमू दर्याहरिरुद ह्या मध्य आशियातील प्रमुख नद्या आहेत. अरल समुद्रबालखाश सरोवर हे येथील सर्वात मोठे पाण्याचे साठे आहेत. गेल्या अनेक दशकांमध्ये मध्य आशियातील नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर सिंचनाकरिता इतरत्र वळवण्यात आल्यामुळे हे दोन्ही पाण्याचे साठे झपाट्याने आटले आहेत.

येथील पुष्कळशी जमीन ओबडधोबड व रूक्ष असून शेतीसाठी अनुकुल नाही. मध्य आशियाच्या मोठ्या भागात कोणताही पाण्याचा साठा नसल्यामुळे येथील हवामानामधील बदल तीक्ष्ण असतात. तसेच पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे पाण्यावरून वाद व तंटे कायम आहेत.


Remove ads

भूभाग व तपशील

Thumb
मध्य आशियाचा नकाशा
अधिक माहिती देश, क्षेत्रफळ किमी२ ...

खालील देशांचे काही भूभाग मध्य आशियामध्ये गणले जावू शकतात.

अधिक माहिती देश, क्षेत्रफळ किमी२ ...


Remove ads

संस्कृती

इस्लाम हा मध्य आशिया, अफगाणिस्तानशिंच्यांग भागातील प्रमुख धर्म आहे. येथील बहुसंख्य लोक सुन्नी पंथाचे आहेत व अफगाणिस्तानाच्या काही भागांत शिया पंथीय अल्पसंख्य वस्ती आहे. इस्लामच्या उदयापूर्वी पारशीबौद्ध हे मध्य आशियातील प्रमुख धर्म होते.

सोव्हिएत संघाच्या कम्युनिस्ट राजवटीखाली मध्य आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगीकरण व पायाभूत सुविधा झाल्या परंतु त्याच बरोबर येथील स्थानिक धर्म व संस्कृती दडपण्याचे प्रयत्न देखील सातत्याने होत राहिले.


महत्त्वाची सांस्कृतिक व आर्थिक केंद्रे

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


अधिक माहिती शहर, देश ...
Remove ads

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads