मध्य रेल्वे क्षेत्र
भारतीय रेल्वेतील एक महत्त्वाचा विभाग From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
मध्य रेल्वे हा भारतीय रेल्वेतील एक महत्त्वाचा विभाग आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहे. भारतामधील पहिली प्रवासी रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी मध्य रेल्वेमार्गावरून धावली. महाराष्ट्रातील बहुतांशी, ईशान्य कर्नाटकातील काही व दक्षिण मध्य प्रदेशमधील काही रेल्वेमार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारित येतात.
मध्य रेल्वेचे उपविभाग
मध्य रेल्वे विभाग ५ उपविभागांमध्ये विभागला गेला आहे.
मुंबई उपविभाग
- मुंबई छशिमट - दादर - कुर्ला
- मुंबई छशिमट - वडाळा रोड - कुर्ला (हार्बर मार्ग)
- कुर्ला - वाशी - नेरूळ - बेलापूर - पनवेल
- कुर्ला - घाटकोपर - ठाणे - दिवा जंक्शन - कल्याण जंक्शन
- दिवा जंक्शन - पनवेल - रोहा
- दिवा जंक्शन - वसई रोड
- कल्याण जंक्शन - कसारा - इगतपुरी
- कल्याण जंक्शन - नेरळ जंक्शन - कर्जत - लोणावळा
पुणे उपविभाग
सोलापूर उपविभाग
भुसावळ उपविभाग

नागपूर उपविभाग
Remove ads
रेल्वे गाड्यांची यादी
Remove ads
मध्य रेल्वेवरील उल्लेखनीय गाड्या
- डेक्कन क्वीन - पुणे ते मुंबई
- हुसेनसागर एक्सप्रेस - मुंबई ते हैदराबाद
- गीतांजली एक्सप्रेस - मुंबई ते कोलकाता
- महालक्ष्मी एक्सप्रेस - मुंबई ते कोल्हापूर
- दीक्षाभूमी एक्सप्रेस - कोल्हापूर ते धनबाद
- आझाद हिंद एक्सप्रेस - पुणे ते कोलकाता
- उद्यान एक्सप्रेस - मुंबई ते बंगळूर
- डेक्कन एक्सप्रेस - पुणे ते मुंबई
- गोदावरी एक्सप्रेस - मनमाड ते मुंबई
- मिरज एक्स्प्रेस - मिरज ते सोलापूर
विकास प्रकल्प
नवीन मार्ग
दुपदरीकरण
गेज रूपांतर
- कुर्डुवाडी - लातूर (नॅरो गेज ते ब्रॉड गेज)
- पंढरपूर - मिरज (नॅरो गेज ते ब्रॉड गेज)
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads