मेरीलँड
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
मेरीलॅंड (इंग्लिश: Maryland, मेरीलंड ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले मेरीलॅंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १९व्या क्रमांकाचे राज्य आहे.
मेरीलॅंडच्या आग्नेयेला अटलांटिक महासागर, नैऋत्येला वॉशिंग्टन डी.सी., पूर्वेला डेलावेर, पश्चिमेला व दक्षिणेला व्हर्जिनिया, वायव्येला वेस्ट व्हर्जिनिया व उत्तरेला पेनसिल्व्हेनिया ही राज्ये आहेत. अॅनापोलिस ही मेरीलॅंडची राजधानी तर बाल्टिमोर हे सर्वात मोठे शहर आहे. मेरीलॅंडच्या क्षेत्रफळाच्या २१ टक्के भाग पाण्याने (चेसापीकचा उपसागर) व्यापला आहे. मेरीलॅंडच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा वॉशिंग्टन-बाल्टिमोर महानगर क्षेत्रात वसला आहे.
दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत मेरीलॅंडचा देशात पहिला क्रमांक लागतो. शेती, जीवशास्त्र संशोधन, बँकिंग, माहिती तंत्रज्ञान हे येथील प्रमुख उद्योग आहेत.
Remove ads
मोठी शहरे
- बाल्टिमोर - ६,२०,९६१
- फ्रेडरिक - ६५,२३९
- रॉकव्हिल - ६१,२०९
गॅलरी
- चेसापीकच्या उपसागरावरील चेसापीक बे ब्रिज.
- मेरीलॅंडमधील प्रमुख रस्ते व महामार्ग
- मेरीलॅंडचे विधानभवन.
- मेरीलॅंडचे २५ सेंट्सचे नाणे.
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads