मोनॅको
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
मोनॅको हा युरोपातील एक 'नगर-देश' आहे. मोनॅको आकाराने जगातील दुसरा सर्वात लहान सार्वभौम देश आहे (सर्वात लहान देश: व्हॅटिकन सिटी). मोनॅकोच्या पूर्वेला भूमध्य समुद्र तर इतर तीन दिशांना फ्रान्स हा देश आहे तर मोनॅकोपासून इटली देशाची सीमा केवळ १६ किमी अंतरावर आहे. मोनॅकोमध्ये राजेशाही सरकार आहे. आल्बर्ट दुसरा हा मोनॅकोचा राजकुमार व सत्ताप्रमुख आहे.
केवळ २.०२ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या मोनॅकोची लोकसंख्या अंदाजे ३३,००० आहे. त्यामुळे हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला देश आहे. मोनॅकोच्या रहिवाशांना वैयक्तिक आयकर भरावा लागत नाही. ह्या कारणास्तव येथे अनेक धनाढ्य उद्योगपती व खेळाडू स्थायिक झाले आहेत.
Remove ads
खेळ
संदर्भ
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads