यू.एस. ओपन
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
यू.एस. ओपन ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवली जाणारी एक वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. टेनिस जगतातील चार महत्त्वाच्या व मानाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स बरोमधील यू.एस.टी.ए. बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर ह्या क्रीडासंकुलात दरवर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांदरम्यान भरवली जाते.
सर्वात पहिली यू.एस. ओपनची आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली ऱ्होड आयलंडच्या न्यूपोर्ट ह्या शहरात तर महिलांसाठी १८८७ साली फिलाडेल्फिया येथे खेळवली गेली. १९६८ सालापासून ही स्पर्धा खुली करण्यात आली. सध्या यू.एस. ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.
Remove ads
विजेते
खुल्या युगात (१९६८ नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रास व जिमी कॉनर्स ह्या टेनिसपटूंनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) तर महिला एकेरीमध्ये ख्रिस एव्हर्टने सहा वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. महिला दुहेरीमध्ये मार्टिना नवरातिलोव्हाने यू.एस. ओपनचा चषक ९ वेळा उचलला आहे.
२०११ मधील विजेते
Remove ads
बाह्य दुवे
मागील विंबल्डन |
ग्रँड स्लॅम स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर |
पुढील ऑस्ट्रेलियन ओपन |
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads