फ्रान्सची द्रुतगती रेल्वे सेवा From Wikipedia, the free encyclopedia
टीजीव्ही (फ्रेंच: Train à Grande Vitesse, अर्थ: दृतगती रेल्वे) ही फ्रान्स देशामधील दृतगती रेल्वे सेवा आहे. एस.एन.सी.एफ. ही फ्रान्सची राष्ट्रीय रेल्वे कंपनी टीजीव्ही रेल्वेगाड्या चालवते.
१९७० च्या दशकात आल्स्टॉम ह्या फ्रेंच कंपनीने टीजीव्ही प्रकल्पाचा विकास केला व २७ सप्टेंबर १९८१ रोजी पहिला टीजीव्ही रेल्वे पॅरिस व ल्योन शहरांदरम्यान धावली. उद्घाटनाच्या वेळी टीजीव्ही ही जगातील केवळ चौथी दृतगती रेल्वे होती. सध्या टीजीव्ही ही जगातील सर्वात वेगवान पारंपारिक (मॅग्लेव्हचा अपवाद वगळता) रेल्वे आहे. ३ एप्रिल २००७ रोजी टीजीव्हीने ५७४.८ किमी/तास (३५७.२ मैल/तास) इतक्या वेगाचा विक्रम नोंदवला.[1] आजवर टीजीव्हीने वेगाचे अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
सुरुवातीला मिळालेल्या प्रचंड यश व लोकप्रियतेमुळे फ्रान्समध्ये विसाव्या शतकाच्या अखेरीस अनेक टीजीव्ही मार्ग चालू करण्यात आले. सध्या फ्रान्समध्ये १,८९७ किमी लांबीचे टीजीव्हीसाठी बनवण्यात आलेले विशेष लोहमार्ग अस्तित्वात असून ९ मार्गांवर टीजीव्ही सेवा कार्यरत आहे. अनेक टीजीव्ही मार्ग फ्रान्सला युरोपातील इतर देशांसोबत जोडतात, ज्यांमध्ये चॅनल टनेलमधून धावणाऱ्या व इंग्लंडला फ्रान्स व बेल्जियमसोबत जोडणाऱ्या युरोस्टार ह्या सेवेचा समावेश आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.