मोन्तेविदेओ (स्पॅनिश: Montevideo; इंग्लिश उच्चारः मॉंटेव्हिडीयो) ही उरुग्वे देशाची राजधानी, सर्वात मोठे शहर व प्रमुख बंदर आहे. हे शहर देशाच्या दक्षिण भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१० साली मोन्तेविदेओ शहराची लोकसंख्या १३,३६,८७८ (उरुग्वेच्या ५० टक्के) तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १९,७३,३८० इतकी होती.

जलद तथ्य
मोन्तेविदेओ
Montevideo
उरुग्वे देशाची राजधानी
Thumb
ध्वज
Thumb
चिन्ह
Thumb
मोन्तेविदेओचे उरुग्वेमधील स्थान

गुणक: 34°53′01″S 56°10′55″W

देश उरुग्वे ध्वज उरुग्वे
विभाग मोन्तेविदेओ
स्थापना वर्ष इ.स. १७२६
क्षेत्रफळ २०९ चौ. किमी (८१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १४१ फूट (४३ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १३,३६,८७८[1]
  - घनता २,५२३ /चौ. किमी (६,५३० /चौ. मैल)
  - महानगर १९,७३,३८०
प्रमाणवेळ यूटीसी - ३:००
www.montevideo.gub.uy
बंद करा

मोन्तेविदेओ दक्षिण अमेरिका खंडाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण शहर मानले जाते. १९३० सालामधील पहिल्या फुटबॉल विश्वचषकाचे सर्व सामने मोन्तेविदेओमध्ये भरवण्यात आले होते. तसेच २६ डिसेंबर १९३३ रोजी अमेरिका (खंड)ातील १९ देशांनी मोन्तेविदेओ येथे लष्करी अनाक्रमणाचा करार केला होता. सध्या मोन्तेविदेओ हे लॅटिन अमेरिकेतील एक मोठे सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. एका अहवालानुसार २००७ साली मोन्तेविदेओ हे लॅटिन अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट राहणीमान असलेले शहर होते.[2][3][4][5][6][7]

जुळी शहरे

मोन्तेविदेओचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

संदर्भ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.