राज्यसभा

भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह From Wikipedia, the free encyclopedia

राज्यसभा
Remove ads

राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह आहे.भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात. राज्यसभेचे पहिली सत्र बैठक मे १३, १९५२ साली झाली।

जलद तथ्य राज्यसभा, प्रकार ...

राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात. राज्यसभेचे सत्र कायमस्वरुपी असून ते लोकसभेप्रमाणे विलीन होत नाही. राज्यसभेला लोकसभेपेक्षा कमी अधिकार आहेत, शिवाय धन विधेयक (Money/Supply Bill) जेथे लोकसभेस अध्यारोही अधिकार आहेत. परस्पर विरोधी ठराव झाल्यास एक संयुक्त बैठक घेतली जाते. परंतु लोकसभेची सभासद संख्या दुप्पट असल्याने त्यांना बहुमत मिळून जाते.

भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेच्या उपाध्यक्षांची निवड सदस्य मतदानाने होते. अध्यक्षांच्या गैरहजरीत उपाध्यक्ष सभेचे कामकाज पाहतात.

Remove ads

सदस्य पात्रता

  1. राज्यसभेचा सभासद होण्यास तो/ती व्यक्ति भारतीय नागरिक असावी.
  2. वय तीस पेक्षा जास्त असावे.
  3. ही व्यक्ती मानसिक रीत्या निरोगी असून कर्जबाजारीही (दिवाळखोर) नसावी.
  4. ह्या व्यक्तीने शपथपत्र द्यावे ज्यात त्याच्या कोणत्याही अपराधी कारवाई करण्यात आली नाही.
  5. आरक्षित जागांसाठी ही व्यक्ती अनुसूचित जाती/ जमातीतील असावी लागते.

संख्याबळ

अधिक माहिती आघाडी, पक्ष ...
Remove ads

सदस्यत्व

सत्र

सामान्यतः राज्यसभेचे दर वर्षी ३ सत्र होतात.

संदर्भ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads