मार्च २८
दिनांक From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
मार्च २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८७ वा किंवा लीप वर्षात ८८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
नववे शतक
अठरावे शतक
- १७७६ - हुआन बॉतिस्ता दि आन्झाने सान फ्रांसिस्कोचा किल्ला बांधायला सुरुवात केली.
एकोणिसावे शतक
- १८५४ - क्रिमियन युद्ध - फ्रान्सने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध-ग्लोरियेटा पासची लढाई - उत्तरेच्या सैन्याने दक्षिणेचे न्यू मेक्सिकोवरील आक्रमण रोखले.
विसावे शतक
- १९३० - तुर्कस्तानमधील कॉॅंस्टेन्टिनोपल व अंगोरा शहरांनी आपली नावे बदलून अनुक्रमे इस्तंबूल व अंकारा अशी ठेवली.
- १९३९ - स्पॅनिश गृहयुद्ध - जनरलास्सिमो फ्रांसिस्को फ्रॅंकोनो माद्रिद शहर जिंकले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध-केप माटापानची लढाई - ॲन्ड्ऱ्यू ब्राऊन कनिंगहॅमच्या नेतृत्वाखाली रॉयल नेव्हीने तीन इटालियन युद्धनौका व दोन विनाशिकांचा धुव्वा उडवला.
- १९७९ - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील थ्री माइल आयलंड अणुशक्ती केंद्रातील शीतक बंद पडला व त्यामुळे किरणोत्सर्गी पाणी वाफरुपे हवेतून पसरले.
- १९७९ - युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान जेम्स कॅलाहानविरुद्ध अविश्वासाचा ठराव एका मताने मान्य झाल्यावर सरकार कोसळले व संसद विसर्जित केली गेली.
- १९९२ - भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे.आर.डी. टाटा यांना भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय सन्मान तत्कालीन राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
- १९९८ - भारतीय कंपनी सी-डॅकने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.
एकविसावे शतक
- २००५ - सुमात्रा बेटावर रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.७ तीव्रतेचा भूकंप.
- २००६ - फ्रान्समधील नवीन कामगार कायद्याविरुद्ध १०,००,००पेक्षा अधिक युनियन सदस्यांचे अनेक शहरात मोर्चे.
- २००८ - भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३०९ धावांची नाबाद खेळी केली व सर डॉन ब्रॅडमन व ब्रायन लारानंतर दोन त्रिशतके फटकावणारा तिसरा फलंदाज झाला. चार वर्षांपूर्वी मार्च २९ला सेहवागने
पाकिस्तानविरुद्ध ३०९ धावांची खेळी केली होती.
- २०२५ - म्यानमारच्या मंडाले शहराजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.७ तीव्रतेचा भूकंप होउन म्यानमार आणि थायलंडमध्ये ४,४०० पेक्षा अधिक लोक मृत्यू पावले.
Remove ads
जन्म
- १६०९ - फ्रेडरिक तिसरा, डेन्मार्कचा राजा.
- १८५१ - बर्नार्दिनो माचादो, पोर्तुगालचा राष्ट्राध्यक्ष.
- १८६८ - मॅक्झिम गॉर्की, वर्ग:रशियन लेखक.
- १८९२ - कार्नेली हेमन्स, फ्रेंच-बेल्जियन शरीरशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेता.
- १९१० - इंग्रीड, डेन्मार्कची राणी.
- १९३० - जेरोम फ्रीडमन, अमेरिकन वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ.
- १९४६ - अलेहांद्रो टोलेडो, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५३ - मेल्चियोर न्डाडाये, बुरुंडीचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६० - होजे मरिया नीव्ह्स, केप व्हर्देचा पंतप्रधान.
- १९६८ - नासीर हुसेन, वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
Remove ads
मृत्यू
- १९३ - पर्टिनॅक्स, रोमन सम्राट.
- १२३९ - गो-तोबा, जपानी सम्राट.
- १२८५ - पोप मार्टिन चौथा.
- १९४१ - व्हर्जिनिया वूल्फ, इंग्लिश लेखिका.
- १९४२ - मिगेल हर्नान्देझ, स्पॅनिश कवी.
- १९६९ - ड्वाइट डी. आयझेनहॉवर, अमेरिकेचा ३४वा राष्ट्राध्यक्ष.
- १९९२ - आचार्य आनंद ऋषीजी, स्थानकवासी जैन धर्मगुरू.
- २००० - शांताराम द्वारकानाथ देशमुख उर्फ राम द्वारकानाथ देशमुख, नामवंत अर्थतज्ज्ञ आणि लेखक.
- २००६ - पीटर उस्तिनोव, ब्रिटिश अभिनेता.
- २०१७ - थेम्प्टन रुस्तमजी अंध्यारुजिना, भारतीय वकील आणि घटनातज्ज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
- शिक्षक दिन - चेक प्रजासत्ताक, स्लोव्हेकिया.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मार्च २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च २६ - मार्च २७ - मार्च २८ - मार्च २९ - मार्च ३० - (मार्च महिना)
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads