हिंदू धर्म
पुरातन भारतीय धर्म किंवा जीवनपद्धती / From Wikipedia, the free encyclopedia
हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा धर्म वा जीवनपद्धती होय.[1] आजही सनातनी हिंदू माणसे स्वधर्माचा हिंदू असा उल्लेख करतात. संस्कृत भाषेत याचा अर्थ 'शाश्वत मार्ग' असा होतो.[2] निरीश्वरवाद, सर्वेश्वरवाद, अनेकेश्वरवाद, एकेश्वरवाद, नास्तिकता, आदि सर्व रूपे या धर्मात एकत्रितपणे दिसतात. अनेक विद्वानांच्या मते हिंदू धर्म हा विविध भारतीय संस्कृती आणि परंपरांंचे संमिश्रण आहे, की ज्याचा कोणीही संस्थापक नाही.
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हिंदू धर्माशी निगडित लेख | |
---|---|
प्रथा
|
हिंदू धर्मात अनेक वेगवेगळ्या उपासनापद्धती, मते, तत्त्वज्ञान आणि संप्रदायांचा समावेश आहे. अनुयायांचा संख्येच्या आधारावर हिंदू धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे. जगातील हिंदू धर्मीयांची संख्या साधारण १ अब्ज १२ कोटी एवढी आहे. बहुसंख्यांक हिंदू हे भारत, नेपाळ आणि मॉरिशस ह्या देशांत राहतात. हिंदू धर्मात अनेक देवी देवता आहेत असे म्हटले जाते. त्यापैकी मुख्य त्रिदेव आहेत जे सृष्टीचे उत्पत्ती, पालनपोषण व संहार करतात: १) ब्रह्मदेव, २) विष्णूदेव, ३)भगवान महादेव.